HW News Marathi
मनोरंजन

मराठी नाट्यसंमेलनाची वादाने सुरुवात

मुंबई | ९८ वे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन १३ जूनला मुलुंडच्या कवी कालिदास नाट्यमंदिरात सुरु होणार आहे. संमेलन सुरू होण्यापुर्वी वादाला तोंड फुटले आहे. वादाची सुरुवात ज्येष्ठ नाट्यनिर्मात्या लता नार्वेकर यांच्यापासून झाली आहे. नार्वेकर यांनी या संमेलनाला उपस्थित राहणार नाही असे म्हटले आहे. लता संमेलनासाठी हजर न राहण्याचे कारण म्हणजे त्यांना निमंत्रण पत्रिका व्हाट्सअॅपवरून पाठवल्याने त्या नाराज झाल्या आहेत.

९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच नाट्य संमेलनच्या पत्रिकेवर राजकीय नेते मंडळींची नावे अधिक असल्याचे सांगून लता यांनी संमेलनच्या आयोजकांवर देखील टीका केली आहे.

तसेच लता यांनी संस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्यावर ही निशाणा साधला. त्या म्हणाल्या, गेल्या चार वर्षापासून तावडे संमेलनाला आले नाहीत. परंतु तावडे निमंत्रण देण्यासाठी फक्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडेच गेले. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंकडे गेले नाहीत. त्यामुळे विनोद तावडे यांच्या भूमिकेवर त्यांनी सवाल उपस्थित केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ती एक प्रवाहिका.. काशीबाई कानिटकर

News Desk

पायल रोहतगीचे शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त ट्वीटनंतर माफी, म्हणे भारतात स्वातंत्र्यच नाही

News Desk

महात्मा गांधींना नोबेल का मिळाला नाही ?

News Desk