HW News Marathi
मनोरंजन

संगीतकार अन्नपूर्णा देवी यांचे निधन

मुंबई | अन्नपूर्णा देवी या भारतातील एक सुप्रसिद्ध संगीतकार होत्या. गुरु मॉ अन्नपुर्णा देवी यांचे मुंबईच्या ब्रीजकॅंडी रुग्णालयात शनिवारी मध्यरात्री मध्यरात्री निधन झाले. मृत्यू समयी त्या ९१ वर्षांच्या होत्या. त्या दक्षिण मुंबईत वास्तव्यास होत्या. त्यांचा जन्म २३ एप्रिल १९२७ रोजी झाला होता. त्या अलाउद्दीन खान यांची मुलगी आणि शिष्य देखील होत्या. त्या मुळच्या उत्तर प्रदेशच्या होत्या. १९७७ मध्ये त्यांना भारत सरकारकडून कला क्षेत्रासाठी दिला जाणार पद्मभूषण हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.

१९४१ ते १९६२ दरम्यान त्यांनी पंडित रविशंकर यांच्याशी विवाह केला. पंडीत रविशंकर हे अलाउद्दीन खान यांचे शिष्य होते. पंडीत रविशंकर यांच्याशी त्यांनी घटस्फोट घेतल्यानंतर अन्नपुर्णा देवी यांनी कधीही सार्वजनिक ठिकाणी आपले संगीताचे कार्यक्रम केले नाहीत. त्यानंतर त्या मुंबईला आल्या आणि त्यांनी मुंबईत शिक्षण सुरू केले. त्यांच्या मुख्य शिष्यांपैकी हरिप्रसाद चौरसिया, निखिल बॅनर्जी, अमित भट्टाचार्य, प्रदीप बरात, सरस्वती शाह (सितार) ही नावे संगीत क्षेत्रात गाजलेली आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रजनीकांत यांच्या ‘पेटा’ सिनेमाच्या ट्रेलरची जोरदार चर्चा

News Desk

ज्येष्ठ दिग्दर्शक राजकुमार बडजात्या यांचे निधन

News Desk

‘पद्मावत’ सिनेमाला देशभरातून विरोधात निदर्शने

News Desk