HW News Marathi
मनोरंजन

प्रिया सोशल मिडीयावर का होतेय व्हायरलं…

मुंबई | आपल्या नजरेच्या आदांनी प्रेक्षकांना घायाळ करणारी अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर हीचे फोटो सध्या पुन्हा एकदा सोशल मिडीयावर व्हायरल होताना पहायला मिळत आहेत. गतवेळी प्रियाचा व्हिडीओ असो किंवा सध्या व्हायरल होणारे फोटो असतो सोशल मिडीयावर प्रियाच्या चाहत्यांचा वर्ग मोठा असल्याचे पहायला मिळत आहे. पुन्हा एकदा प्रियाने शेअर केलेले नवीन फोटो सोशल मिडीयावर भलतेच व्हायरल होताना पहायला मिळत आहेत. प्रिया ने आपले दोन फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत सध्या सोशल मिडीयावर हे फोटो प्रचंड व्हायरल होताना पहायला मिळत आहेत. या फोटो मध्ये प्रिया सफेद साडी आणि लाल रंगाचा ब्लाउज अशा पेहरावात अतिशय सुंदर दिसत आहे. तिच्या या फोटो मधील पेहरावामुळे तीच्या चाहत्यांना भुरळ पाडली आहे.

https://www.instagram.com/p/BnAt1vKjWk8/?utm_source=ig_web_copy_link

या फोटोमध्ये प्रिया पावसाळ्यातील निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत असल्याची दिसून येत आहे. सोशल मिडीयावर कसे चर्चेत रहाता येईल यासाठी प्रिया नेहमीच प्रयत्नशील असल्याचे दिसून येते. हल्लीच प्रियाने पुरग्रस्तांना अर्थिक मदत केलेली आणि त्यासंदर्भात तीने तिच्या चाहत्यांना सोशल मिडीयाद्वारे सांगितले होते.

https://www.instagram.com/p/Bm7kElrjdIM/?utm_source=ig_web_copy_link

प्रिया लवकरच मल्याळम चित्रपट ‘उरु आदर लव’ मधून आपल्या कारकिर्दीला सुरुवात करणार आहे. ती बीकॉमच्या प्रथम वर्षाची विद्यार्थीनी आहे. मल्याळम चित्रपटातील ही नवीन अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर बॉलिवूडच्या शाहरुख खान आणि रणवीर सिंग सारख्या अभिनेत्यांसोबत काम करू इच्छित आहे. सुत्रांच्या माहितीनुसार प्रिया लवकरच बॉलीवुड मध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे. तिला अनेक चित्रपटांमधून ऑफर देखील आलेली आहे. याबाबत बोलताना १८ वर्षांची असलेली प्रिया सांगते मला मिळालेली प्रसिद्ध नाव हे माझ्यासाठी आश्चर्याचा धक्का देणारे अविश्वसनीय आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांचे निधन

swarit

लोकसभेच्या निकालानंतर दुसऱ्याच दिवशी प्रदर्शित होणार ‘पीएम नरेंद्र मोदी’

News Desk

‘द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ चित्रपटाच्या दिग्दर्शक विजय रत्नाकर गुट्टे यांना अटक

swarit