Site icon HW News Marathi

संस्कृतभारतीने आंतरराष्ट्रीय संस्कृत लघुपट महोत्सव २०२३ ची केली घोषणा

पुणे | संस्कृत भाषेच्या पुनरुज्जीवनासाठी कार्य करणाऱ्या संस्कृतभारती संस्थेने आंतरराष्ट्रीय संस्कृत लघुपट महोत्सवाची  (International Sanskrit Short Film Festival) घोषणा केली आहे. संस्कृत लघुपट महोत्सवाचे हे चौथे वर्ष असून यावर्षी पहिल्यांदा हा महोत्सव आंतरराष्ट्रीय पातळीवर आयोजित करण्यात आला आहे. कोरोना महामारीनंतर तब्बल दोन वर्षांनी तरुण प्रतिभावान चित्रपट निर्मात्यांना आंतरराष्ट्रीय संस्कृत लघुपट महोत्सव २०२३ मध्ये सहभागी होण्यासाठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून निमंत्रित करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेत चित्रपट दिग्दर्शक दिगपाल लांजेकर आणि संस्कृतभारतीचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख शिरीष भेडसगावकर उपस्थित होते.

सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कारांव्यतिरिक्त अकरा वेगवेगळ्या श्रेणींसाठी देखील पुरस्कार देण्यात येणार आहेत. सर्वोत्कृष्ट संहिता, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट संपादन, सर्वोत्कृष्ट ध्वनी रचना, सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट संगीत आणि सर्वोत्कृष्ट गीतकार या विभागांसाठी रोख पारितोषिक, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र दिले जाईल.

सूचना व प्रवेशप्रक्रिया

स्पर्धेत फक्त संस्कृत भाषेतील लघुपटांनाचं ग्रहाय धरले जाणार असून कमाल कालावधी मर्यादा ५ मिनिटे आहे. या स्पर्धेत संस्कृत लघुपट पाठविण्याची शेवटची तारिख ३० नोव्हेंबर २०२२ असून सहभागी लघुपटांचे परीक्षण डिसेंबर महिन्यात होणार आहे. जानेवारी २०२३ च्या पहिल्या आठवड्यात नामांकनाची घोषणा करण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण सोहळा जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात नागपुरात आयोजित करण्यात आला आहे.

विजयी स्पर्धकांसाठी खास आकर्षण

पहिल्या स्थान पटकवणाऱ्या लघुपट निर्मिती संघाला ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि रोख बक्षीस एक लाख रुपये दिले जाणार आहे. द्वितीय आणि तृतीय पारितोषिकांना ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि रोख बक्षीस पंचात्तर हजार रुपये आणि पन्नास हजार रुपये देण्यात येनार आहे. तसेच, सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कारांव्यतिरिक्त अकरा वेगवेगळ्या श्रेणींसाठी देखील पुरस्कार देण्यात येणार आहेत. सर्वोत्कृष्ट संहिता, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट संपादन, सर्वोत्कृष्ट ध्वनी रचना, सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट संगीत आणि सर्वोत्कृष्ट गीतकार या विभागांसाठी रोख पारितोषिक, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र दिले जाणार आहे. प्रत्येक सहभागी लघुपटाला प्रमाणपत्र देण्यात येणार असून स्पर्धेचा इतर सर्व तपशील संस्कृतभारतीची वेबसाईट www.samskritabharti.in यावर प्रसिद्ध केला आहे.

Exit mobile version