HW News Marathi
मनोरंजन

‘टेक केअर गुड नाईट’ ३१ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई | एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट आणि एस पी एंटरटेन्मेंट प्रस्तुती असलेला नवीन मराठी चित्रपट ‘टेक केअर गुड नाईट’ ३१ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर अभिनेता सचिन खेडेकर,महेश मांजरेकर, इरावती हर्षे, आदिनाथ कोठारे आणि पर्णा पेठे या चित्रपटातील कलाकारांच्या प्रमुख उपस्थित मुंबईत नुकताच प्रदर्शित करण्यात आला. यावेळी या चित्रपटाचे दिग्दर्शक गिरीश जयंत जोशी हे सुद्धा उपस्थित होते. गिरीश जयंत जोशी यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची निर्मिती हिमांशू केसरी पाटील आणि महेश मांजरेकर यांनी केली असून नरेंद्र भिडे यांचे त्याला संगीत दिले आहे.

काय आहे कथा ?

या चित्रपटाची कथा ही एका शहरातील कुटुंबाची असून या कुटुंबाने आपले स्थैर्य आणि सन्मान यासाठी एका सायबर गुन्हेगाराविरोधात दिलेला लढा यात रेखाटला गेला आहे. हा लढा देताना या कुटुंबाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यातील वडिलांना बदलत्या तंत्रज्ञानाचे धडे घेत तंत्रज्ञानाबद्दलचे त्यांचे अज्ञान दूर करून घ्यावे लागते. आपल्या समुपदेशन कौशल्यावर बसलेली धूळ पुसत त्याचा वापर यातील आईला याकामी करून घ्यावा लागतो. आपल्या आई वडीलांबरोबरचा संवादाचा तुटलेला धागा यातील मुलीला पुन्हा जोडावा लागतो.

कथेमध्ये मग या सर्व गोष्टी पुढे येतातच पण त्याचबरोबर आजच्या तंत्रज्ञानाने व्यापलेल्या जीवनशैलीचे अनेक पैलूही उलगडत जातात. या संकल्पनेचा जन्म त्यांच्या एका नातेवाईकच्या बाबतीत जो प्रसंग त्यांच्या वयाच्या ५०व्या वर्षी घडला. हे नातेवाईक काही काळासाठी परदेशात असतात. परत आल्यावर त्यांच्या लक्षात येते की, त्यांचे काही लाख रुपये हे त्यांच्या क्रेडीट कार्डावरून ऑनलाइन काढले गेले आहे. “अत्यंत हतबल झालेल्या या नातेवाईकांनी मग मला मदतीसाठी दूरध्वनी केला. मी मग त्यांना तक्रार नोंदविण्यासाठी सायबर सेल विभागात घेऊन गेलो.

त्यावेळी पोलीस अधिकाऱ्यांशी झालेल्या संभाषणामध्ये मला माझ्या काकांच्या बाबतीत घडलेल्या त्या घोटाळ्याबाबत आणखी माहिती मिळत गेली.पण त्याचवेळी संपूर्ण जगात या अशा घोटाळ्यांचे प्रमाण किती मोठे आहे, हे ध्यानात आले. जगभरात लाखो लोक मोबाइल, क्रेडीट कार्ड, इंटरनेट वापरतात आणि त्यावरून व्यवहार करतात. तो त्यांच्या रोजच्या जीवनाचा भाग झालेला असतो. या सर्वांच्या बाबतीत हा धोका संभवतो. अशी कोणती नेमकी गोष्ट असते की ज्यामुळे सायबर गुन्हेगारांना या लोकांच्या आयुष्यात आणि व्यवहारात शिरकाव करण्याची संधी मिळते, हे मला शोधून काढायचे होते. एक लेखक म्हणून याबद्दल लिहिणे खूप गरजेचे आहे, असे मला वाटत राहिले,” असे लेखक गिरीश जोशी यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Gandhi Jayanti : खादी व ग्रामोद्योग आयोगाकडून ‘खादी फेस्ट २०१८’चे आयोजन

Gauri Tilekar

येत्या काळात महाराष्ट्र राज्य कबड्डीत देशात अव्वल असेल: होनप्पा गौडा

News Desk

Kargil Vijay Diwas : राज्यातील ३०० चित्रपटगृहात युवकांसाठी ‘उरी’चे फ्री शोज  

News Desk