HW News Marathi
मनोरंजन

‘ठाकरे’ सिनेमा प्रदर्शितच होऊ देणार नाही !

मुंबई | शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकीय जीवनावर आधारीत ‘ठाकरे’ सिनेमा २५ जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. परंतु ठाकरे या सिनेमाला संभाजी ब्रिगेड या संघटनेने विरोध केला आहे. केवळ विरोध नव्हे, तर ‘ठाकरे’ सिनेमा प्रदर्शितच होऊ देणार नाही, असा इशाराच संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कपिल ढोके यांनी दिला आहे.

‘ठाकरे’ सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांवर चित्रित केलेल्या दृश्यांवर संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला असून, ते दृश्य सिनेमातून तात्काळ वगळावे, अन्यथा सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, असा धमकी वजा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे. अन्यथा महाराष्ट्रातल्या एकाही सिनेमागृहामध्ये हा सिनेमा संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते प्रदर्शित होऊ देणार नाहीत,असे ढोके यांनी सांगितले आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बायोपिक ‘या’ दिवशी होणार रिलीज

News Desk

#IndependenceDay | पूरग्रस्तांचे पुनर्वसन लवकरात लवकर करु !

News Desk

बाप्पाच्या वाळू शिल्पातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

News Desk