Site icon HW News Marathi

68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात मराठी विभागात ‘गोष्ट एका पैठणीची’ ठरला उत्कृष्ट सिनेमा

मुंबई | नवी दिल्लीत नॅशनल मीडिया सेंटरमध्ये 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून अजय देवगणची आज (22 जुलै) घोषणा करण्यात आली. तर राष्ट्रीय चित्रपटात मराठी विभागात ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे.या पुरस्कारांसाठी दरवर्षी हिंदीसह, मराठी, कन्नड, मणिपुरी, पंजाबी, तमिळ, तेलुगू, छत्तीसगढ़ी, हरियाणवी या भाषांसह इतर प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांना नामांकन दिली जातात.

अशी आहे 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांची यादी
सर्वोत्कृष्ट लोकप्रिय सिनेमा – तान्हाजी
सर्वोत्कृष्ट अभिनेता – अजय देवगण
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – गोष्ट एका पैठणीची
चित्रपटांसाठी अनुकूल राज्य – मध्यप्रदेश

सर्वोत्कृष्ट गीतकार – मनोज मुन्तशिर

पार्श्वगायनाचा राष्ट्रीय पुरस्कार – राहुल देशपांडे

उल्लेखनीय फिचर फिल्म – जून (मराठी), गोदाकाठ (मराठी), अवांछित (मराठी)

सर्वोत्कृष्ट बालकलाकार मराठी सिनेमा – अनिश गोसावी (टकटक), आकांक्षा पिंगळे, दिव्येश इंदुलकर (सुमी)

सर्वोत्कृष्ट सामाजिक सिनेमा – फनरल (मराठी)

सर्वोत्कृष्ट बालपट – सुमी

सर्वोत्कृष्ट साऊंड इंजिनिअर – अनमोल भावे (मी वसंतराव)

सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शक – विशाल अय्यर (परीह)

कौटुंबिक मूल्यांवर आधारित सर्वोत्तम चित्रपट नॉन-फिचर फिल्म श्रेणी – कुंकुमार्चन

Exit mobile version