HW News Marathi
मनोरंजन

हा आहे ‘तानाजी’चा फर्स्ट लूक

मुंबई | नववर्षातच्या सुरुवातीला अभिनेता अजय देवगनने आपल्या चाहत्यांसाठी खास भेट दिली आहे. अजयचा आगामी सिनेमा ‘तानाजी-द अनसंग वॉरियर’ची घोषणा झाल्यापासूनच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. तानाजी या सिनेमातील अजय देवगणचा फर्स्ट लूकसोबत एक पोस्टर रिलीज केला आहे. ‘तानाजी’ हा चित्रपट मराठा योद्धा तानाजी मालुसरे यांचा बायोपिक आहे. अभिनेता अजय देवगनने २०१७ मध्‍ये चित्रपट ‘तानाजी’ ची घोषणा केली होती.

तानाजी-द अनसंग वॉरियर या सिनेमाचे दिग्दर्शक ओम राऊतने यांनी केले असून अजय देवगण तानाजी मालुसरे यांची मुख्य भूमिका साकारणार आहे. या सिनेमाचे बजेट जवळपास १५० कोटींचे आहे. यातील सर्वाधिक खर्च वीएफएक्सवर करण्यात येणार आहे. ‘तानाजी’ चित्रपटातून अजय देवगन आणि काजोल तब्‍बल ८ वर्षांनंतर एकत्र मोठ्‍या पडद्‍यावर दिसणार आहे. हा बिग बजेट चित्रपट असून २०१९ मध्‍ये दसरा किंवा दिवाळीत रिलीज होईल, असे म्‍हटले जात आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चॉकलेट फज

News Desk

जाणून घ्या… मकरसंक्रांतीला पतंग उडविण्यामागचे वैज्ञानिक कारण

News Desk

मिस इंडिया २०१८ स्पर्धेत मुंबईतील महिलेने मारली बाजी

News Desk