HW Marathi
क्राइम मनोरंजन

अभिनेता करण ओबेरॉयला बलात्कार प्रकरणी अटक, ९ मेपर्यंत पोलीस कोठडी

मुंबई | बॉलिवूड अभिनेता आणि प्रसिद्ध फिटनेस मॉडेल करण ओबेरॉय यांच्यावर बलात्कार प्रकरणामध्ये मुंबईत अटक करण्यात आली आहे. करण ओबेरॉयला एका महिला ज्योतिषीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला असल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली आहे. बलात्कार पीडितेचा व्हिडीओ बनवणे आणि तो व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल केल्याचा देखील आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.

ओशिवारा पोलिसांनी त्याला आज (६ मे) दुपारी अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केले आहे. न्यायालयाने आरोपी करणला ९ मेपर्यंत पोलीस कोठडीची शिक्षा सुनावली आहे. करण ओबेरॉय हा ‘जस्सी जैसी कोई नहीं’ या टीव्ही शोमुळे घराघरात पोहोचला होता.  त्याच्याविरोधात मुंबईतील ओशिवारा पोलीस स्थानकामध्ये भादवी कलम ३७६ (बलात्कार) आणि ३८४ (ब्लॅकमेल) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Related posts

विख्यात मराठी कवी ग.दि. माडगूळकर

News Desk

पत्नीचे फेक अकाऊंट बनवून अपलोड केले अश्लील फोटो

News Desk

दरोडेखोरांकडून बँक अधिकाऱ्यासह पत्नीचा खून; दोन मुली जखमी

News Desk