HW News Marathi
मनोरंजन

ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांचे निधन

मुंबई | ज्येष्ठ गीतकार आणि संगीतकार यशवंत देव यांनी वयाच्या ९२ वर्षी अखेराचा श्वास घेतला. मंगळवारी सकाळी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील दादर भागातल्या शुश्रूषा रुग्णालयात उपचार सुरू होते. आपल्या लेखनकौशल्य आणि संगीत दिग्दर्शनाने अनेक वर्ष त्यांनी संगीतक्षेत्रावर अधिराज्य गाजविले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सायंकाळी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येईल. मराठी चित्रपटगीत, नाट्यपद, अभंग, गजल, भावगीत, समूहगीत, लोकगीत, युगुलगीत यांच्यासह संगीताच्या अनेक क्षेत्रांमध्ये यशवंत देव यांनी आपला वेगळा ठसा उमटविला.

यशवंत देव यांचा अल्प परिचय

जन्म १ नोव्हेंबर १९२६ साली झाला होता. वडिलांकडून मिळालेला संगीतसाधनेचा वारसा यशवंत यांनी पुढे कायम चालविला. जी. एन. जोशी आणि गजाननराव वाटवे यांच्या शब्दप्रधान गायकीमुळे यशवंत देव संगीताकडे वळले. सुरुवातीच्या काळात यशवंत देव यांनी लग्नानंतर रेशनिंग ऑफिसमध्ये नोकरी केली. नोकरी सांभाळत ‘शहजादा’ चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी त्यांनी पार पाडली होती. त्यानंतर १९५१मध्ये त्यांनी सतारवादक म्हणून एच. एम. व्ही.त नोकरीला लागले आणि त्यानंतर त्यांनी खऱ्या अर्थाने संगीत क्षेत्रात स्वत:ला वाहून घेतले.

यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेली अजरामर गाणी

  • या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे
  • भातुकलीच्या खेळामधली
  • तुझे गीत गाण्यासाठी
  • कुठे शोधीसी रामेश्वर
  • अखेरचे येतील माझ्या
  • सांगा कसं जगायचं
  • अशी पाखरे येती आणि…
  • असेन मी नसेन मी
  • कुणी जाल का सांगाल का
  • जीवनात ही घडी अशी राहू दे
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बॉलिवूड अभिनेत्री ईशा कोप्पीकरचा भाजपमध्ये प्रवेश

News Desk

मी कुणाचीही माफी मागणार नाही !

News Desk

बिग बींना ७६व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा….

Gauri Tilekar