वय वर्ष अवघं २३, पाठीशी अखंड महाराष्ट्राने भरभरून प्रेम केलेल्या लोकनेत्या पित्याचे आशीर्वाद, सोबत जनतेची साथ आणि मनात जनसेवेचा ध्यास घेतलेल्या अशा एका तरुण नेत्याच्या राजकीय प्रवासाला नुकतीच दमदार सुरुवात झालीय आणि हा तरुण नेता आहे रोहित आर आर पाटील. रोहित पाटलांनी काहीच दिवसांपूर्वी विरोधकांना पराभवाची धूळ चारत कवठे-महाकाळ नगर पंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आणून आपलं वर्चस्व सिद्ध करून दाखवलं. या पार्श्वभूमीवर, राजकीय वर्तुळात आणि सर्वसामान्यांमध्ये फक्त त्यांच्याच नावाची चर्चा आणि कौतुक सुरूय आणि ह्याच निमित्ताने आज (२७ जानेवारी) एच.डब्ल्यू.मराठीच्या प्रतिनिधी गौरी टिळेकर यांनी खास बातचीत केलीय रोहित आर आर पाटील यांच्याशी.
#RohitRRPatil #RRAaba #RRPatil #SharadPawar #NCP #MVA #MaharashtraPolitics #KavatheMahakal #AssemblyElections2024 #MLA