Site icon HW News Marathi

Legislative Council Election : अखेर 2 तासानंतर विधान परिषदेच्या मतमोजणीला सुरुवात

मुंबई | विधान परिषदेसाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीत 10 जागेसाठी 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.  विधान परिषदे निवडणुकीसाठी आज (20 जून) सकाळी 9 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून हे मतदान 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. नुकतेच राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाला. यामुळे महाविकास आगाघासाठी विधान परिषदेच्या निवडणुकीत महत्वाची आहे.

विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला विजयीसाठी पहिल्या पसंतीस 25 ते 26 मतांची गरज आहे.  विधान परिषदे निवडणुकीवरून राज्यातील सर्व पक्षांनी त्यांच्या आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामी ठेवले आहे. राज्यसभा निवडणुकीनंतर  खबरदारीचा उपाय म्हणून शिवसेनेकडून काल (19 जून) विधान परिषदेच्या मतदान प्रक्रियेसाठी शिवसेनेने त्यांच्या आमदारांची रंगीत तालीम घेतली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदाना वेळी होणाऱ्या चुका टाळण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरू आहे.

LIVE UPDATES

 

 

 

  • विधान परिषदेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाचे निकाल जाहीर झाले आहे. यात भाजपचे ४, राष्ट्रवादी काँग्रेसचे २ आणि शिवसेनेचे २ अस एकूण ८ उमेदवार विजयी झाले आहेत. 
  • अखेर दोन तासानंतर विधान परिषदेच्या मतमोजणीला सुरुवात
  • काँग्रेसने भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मतदानावर आक्षेप घेतला आहे. जगतापांनी त्यांची मतपत्रिका दुसऱ्या मतपेटीत टाकल्याचा आरोप काँग्रेने केला आहे. आणि मुक्ता टिळक यांच्याही मतदानावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे.
  • विधान परिषदेच्या निवडणुकीची मतदान पूर्ण झाले, पाच वाजता मतमोजणीला होणार सुरुवात
  • विधान परिषद निवडणुकीसाठी 279 आमदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. आता फक्त राज्याचे उपमुख्य मंत्री अजित पवार, जयंत पाटील, सुधीर मुनगंटीवार आणि गिरीष महाजन यांचे मतदान बाकी आहे
  • विधान परिषदेत सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मतदान करण्याची परवानगी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
  • दुपारी 1 वाजेपर्यंत 246 आमदारांचे मतदान पार पडले असून 39 आमदारांचे मतदान बाकी
  • विधानपरिषदेसाठी आज सकाळी ९ वाजता मतदान सुरु झाले असून, आतापर्यं १०० आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
  • विधान परिषदेसाठी आतापर्यंत 102 आमदारांनी केले मतदान
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान भवनात दाखल झाले आहे.
  • राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे  विधान परिषदेते मतदान करण्यासाठी विधानभवनात दाखल झाले आहे.

 

 

Exit mobile version