HW Marathi
राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

छत्रपती शिवाजी महाराज काय तुमची एकट्याची जहागीर आहे का ?

पुणे | राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून काढण्यात येणाऱ्या शिवस्वराज्य यात्रेची खबर लागताचे भाजपच्या चाळीस पैशांच्या लावरीसांमध्ये पोठसूळ उठला, शिवस्वराज्य यात्रा का काढता ?, छत्रपती शिवाजी महाराज काय तुमची एकट्याची जहांगीर आहे का ? असे असा प्रश्न करत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी भाजपवर टीका केली आहे. राष्ट्रवादीच्या दुसऱ्या टप्प्यातील शिवस्वराज्य यात्रेच्या पैठण सभेदरम्यान कोल्हे बोलत होते.

विधानसभा निवडणुकीची बिगूल वाजण्यापूर्वी सत्ताधारी युतीसह विरोधी पक्षांकडून यात्रा सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा २१ ऑगस्टपासून पुन्हा सुरू होणार आहे. तर आज (१९ ऑगस्ट) राष्ट्रवादी काँग्रेसची ‘शिवस्वराज्य यात्रा’ स्थगित झालेली पुन्हा सुरू करण्यात आली. पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शनाने यात्रेला प्रारंभ झाला.

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी पैठणमधून सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेचा खरपूरस समाचार घेतला. राज्यात महापुर संकट ओढवले असताना सरकार कुठे गायब होते? असा सवाल त्यांनी केला. कोल्हे यांनी आदित्य ठाकरेंवर चांगलाच हल्लाबोल केला.

 

 

Related posts

पोलीस अधिकाऱ्यासाठी मुख्यमंत्री ममता बनर्जींचे धरणे आंदोलन

News Desk

आता ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’मध्ये दिसणार पंतप्रधान मोदी

News Desk

…अन् विखे-पाटलांनी विचारले कुठले बटण दाबू …?

News Desk