HW Marathi
राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

आम्ही यात्रा काढल्यानंतर अनेकांना जाग आली !

धुळे | “आम्ही यात्रा काढल्यानंतर अनेकांना जाग आली आणि त्यांनी देखील यात्रा काढल्या आहेत. मात्र, यात्रा काढण्याची ही भाजपची  परंपरा असून त्यांच्या यात्रेंना माझ्या शुभेच्छा,असे म्हणत मुख्यमंत्री देवेंड फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला. भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला काल (२२ गुरुवारी) सुरुवात झाली आहे. या यात्रेदरम्यान धुळे येथे प्रसार माध्यमांना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

मुख्यमंत्री प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले की, “आम्ही यात्रा काढल्यानंतर अनेकांना जाग आली आणि त्यांनी देखील यात्रा काढल्या आहेत. मात्र, यात्रा काढण्याची ही भाजपची  परंपरा असून त्यांच्या यात्रेंना माझ्या शुभेच्छा देतो. आम्ही विरोधात असताना संघर्ष यात्रा काढली होती. आता आम्ही विरोधात असताना संघर्ष यात्रा काढली होती. आता संवाद यात्रा काढत आहोत. आणि आमच्या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. भाजप सरकारच जनतेच्या अपक्षा पूर्ण करू शकते, असा विश्वास जनतेच्या मनात दिसून येत आहे.

‘राष्ट्रवादीने सुरू केलेल्या यात्रेची काय परिस्थिती झाली आहे, हे तुम्हाला माहितीच आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या भ्रष्टाचाराची जत्रा निघाल्याने त्यांच्या यात्रेचे काय होईल ते माहिती नाही,”  विरोधाकांनी सुरू केलेल्या यात्रांच्या परिस्थिती मुख्यमंत्र्यांनी टीका केली.
तसेच राज्यात लोकांचा कल आमच्यासाठी अनुकूल आहे. राज्यात पुन्हा युतीचेच सरकार येईल. तसेच आम्हाला मोठे बहुमत मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. यावेळी धुळे जिल्ह्यात केलेल्या विविध विकासकामांचा तपशीलही मुख्यमंत्र्यांनी वाचून दाखवला.

Related posts

LIVE UPDATE | काश्मीरच्या ऐतिहासिक निर्णयानंतर पंतप्रधान मोदींचा जनतेशी संवाद

News Desk

पॉलिटिशन्स पोल, कोण बनविणार सरकार ?

News Desk

आम्ही ईश्वरचंद्र विद्यासागर यांना झुकून नमस्कार करीत आहोत!

News Desk