HW Marathi
महाराष्ट्र राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

विधानसभा निवडणुकीत विरोधकांचे आमदार निवडून येतील का ?

सोलापूर | यंदाच्या विधानसभानिवडणूकीत विरोधकांचे आमदार निवडून येतील का नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री पुढे असे देखील म्हणाले की, आता महाराष्ट्रात कोणाबरोबर लढायचे हाच प्रश्न माझ्यापुढे उभा राहिला आहे, असेही ते म्हणत विरोधाकांना टोला लगावला. मुख्ममंत्री आज (१० ऑक्टोबर) मंगळवेढा येथील झालेल्या सभेत सवाल उपस्थित केला आहे.

राज्यात पाच वर्षाच्या कार्यकाळात भाजप सरकारने पारदर्शक कारभार केला आहे. यामुळे सर्वसामान्यांचे जीवनमान उंचाविण्याबरोबर शासनाच्या योजनांच्या माध्यमातून गोरगरीबांना न्याय देण्याचे काम भाजप सरकराने दिले आहे. त्यामुळे यंदाच्या विधानसभानिवडणूकीत विरोधकांचे आमदार निवडून येतील का नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मागील दोन दिवसांपुर्वी काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचे संकेत दिले, हे संकेत नसून विरोधी पक्षात बसण्यासाठीची धडपड सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यानी सुशीलकुमार शिंदे यांना नाव घेता टोला लगाविला आहे. याशिवाय कोल्हापूर, सांगली, सातारा या भागात सातत्याने येणाऱ्या महापूरचे पाणी सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळा भागात वळविणार आहे. त्याबाबतचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे. तसेच मंगळवेढ्यातील बसवेश्वर व चोखोबा स्मारक लवकर पूर्णत्वास येईल असेही आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

Related posts

#Coronavirus : कोवीडसंदर्भात डॉक्टरांचा सल्ला घ्या ! 

News Desk

राफेलचे भूत या सरकारला गाडल्याशिवाय राहणार नाही !

News Desk

पाणी टंचाई उपाय व स्वच्छता विषयक घटकासाठी समन्वयाने सांघिकरित्या प्रयत्न करा – सदाभाऊ खोत   

News Desk