HW Marathi
महाराष्ट्र राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

विश्वादर्शक ठराव मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकासआघाडीने विधानसभेत विश्वासदर्शक ठराव बहुमताने मंजूर झाला आहे. महाविकासआघाडीच्या बाजूने १६९ आमदारांने तर ४ आमदारांनी तटस्थ भूमिका घेतली. मनसे, एमआयएम आणि माकप या तिन्ही पक्षातील आमदारांनी तटस्थ राहणे पसंत केले. मात्र, भाजपने विश्वासदर्शक ठरावावर बहिष्कार घातला. विश्वासदर्शक ठराव बहुमताने पास झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा विधानसभेत भाषण केले.

या भाषणात उद्धव ठाकरेंनी “आयुष्यात पहिल्यांदा या सभागृहात आलो आहे. इथे येताना दडपण होते. कारण इथे कसे वागायचे हे मला ठाऊक नव्हते, मला सभागृहात कसे होईल याची चिंता होती, पण इथे आल्यावर कळले मैदानातच चांगले असते. मोकळ्या मैदानात मी तलवारबाजी करणार नाही. मी समोरासमोर लढणारा आहे. शत्रूला अंगावरती घेणारा आहे. आता कोणी शत्रू नाही, तर राजकीय विरोधक आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. असे म्हणत भाषणाला सुरुवात केली. दरम्यान सरकारवर विश्वास व्यक्त करणाऱ्या सर्व आमदारांचे आणि त्याचबरोबर जनतेचे आभार मानले. जनतेच्या आशिर्वादाशिवाय हे शक्य नव्हते, असेही ते यावेळी म्हणाले.

“हो, मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली. हो मी पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेईल, हो मी आई वडिलांची शपथ घेतली मी पुन्हा घेईल. जर हा गुन्हा असेल तर तो एकदा नाही, मी दहा वेळा नाही, प्रत्येक जन्मात केल्याशिवाय राहणार नाही.” असेही उद्धव ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, “जो आपल्या दैवताला मानत नाही, आई-वडिलांना मानत नाही. तो जगायच्या लायकीचा नाही, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी भाजप आणि विरोधकांवर टीका केली.

 

Related posts

ममता बॅनर्जी मोदींच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत

News Desk

अखेर वंचित बहुजन आघाडीला मिळाले नवे चिन्ह

News Desk

आता साधू संतांना मिळणार पेन्शन

News Desk