HW Marathi
राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

विधानसभा अध्यक्षानंतर आता विरोधी पक्षनेत्याची निवड होण्याची शक्यता

मुंबई | महाविकासाआघाडीकडून शनिवारी (३० नोव्हेंबर) सभागृहात १६९ आमदारांसह बहुमत सिद्ध करण्यात आल्यानंतर आज (१ डिसेंबर) अखेर महाराष्ट्र विधानसभेच्या स्थायी अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. विधानसभेच्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपचे उमेदवार किसान कथोरे यांनी माघार घेतल्याने विधानसभेच्या अध्यक्षपदी नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाली आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्षांच्या निवडीनंतर आता विरोधी पक्षनेत्याची देखील निवड होणार असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विरोधी पक्षनेतेपदासाठी भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव चर्चेत आहे. त्यामुळे, आता विरोधी पक्षनेतेपदी नेमकी कोणाची निवड होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Related posts

मराठी बिग बॉस फेम अभिजीत बिजुकले लोकसभा पोटनिवडणूक लढविणार

News Desk

‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली मदत

News Desk

कोरोना काळातील विजबिले कमी करण्याची मुंबई भाजपची मागणी

News Desk