HW Marathi
महाराष्ट्र राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

‘त्या’ प्रक्षोभक भाषण प्रकरणी मंगल प्रभात लोढा यांना आयोगाकडून नोटीस

मुंबई | राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. सर्व राजकीय पक्ष अंतिम टप्प्याच्या प्रचार सभा घेत आहेत. या प्रचारसभेत सर्व पक्ष एकमेंकावर आरोपाच्या फैरी झाडत आहेत. भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांच्या प्रक्षोभक भाषणा केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाकडून नोटीस पाठविण्यात आली आहे. लोढा यांनी मुंबादेवी मतदारसंघात महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार पांडुरंग सकपाळ यांच्यासाठी बुधवारी (१६ ऑक्टोबर) प्रचार सभा घेण्यात आली.

या प्रचार सभेदरम्यान लोढा यांनी समाजामध्ये तेढ निर्माण करणारे विधान केले. लोढा यांनी भाषणादरम्यान १९९२ मधील मुंबईतील दंगलींचा उल्लेख केला. जुन्या इमारती पडल्यानंतर येथील रहिवाशांना मानखुर्द आणि धारावीत स्थलांतरीत करण्यात आले होते. त्यामुळे असे वाटते की, ही ठिकाणे फक्त काही विशेष समाजाच्या लोकांसाठीच राखीव ठेवण्यात आली, असल्याचेही लोढा यांनी यावेळी सांगितले. मात्र, हिंदू-मराठी बांधवांना दूरच्या भागांमध्ये शिबिरांमध्ये जावे लागते. अशा प्रकारे तेढ निर्माण करणारे विधानांसाठी लोढा यांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे. आयोगाने लोढा यांना त्यांच्या वक्तव्यावर उत्तर देण्याबरोबरच त्याचे स्पष्टीकरणही मागवले आहे.

प्रचारसभेत नेमके काय म्हटल लोढा

लोढा यांनी मुंबादेवी मतदारसंघात महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार पांडुरंग सकपाळ यांच्यासाठी बुधवारी (१६ ऑक्टोबर) प्रचार सभा घेण्यात आली. यावेळी भाषणावेळी लोढा म्हणाले की, “मुंबादेवी मतदारसंघात महायुतीचे शिवसेनेचे यांनी दंगलींवेळी स्फोट झाले आणि गोळ्या झाडल्या गेल्या त्या इथून केवळ पाच किमी अंतरावरील गल्ल्यांमधून झाडण्यात आल्या होत्या. यामध्ये २५० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या लोकांच्या मतांवर जिंकलेली व्यक्ती आपल्या मदतीसाठी कशी येईल,” अशा शब्दांत लोढा यांनी कॉंग्रेसचे उमेदवार अमीन पटेल यांचे नाव न घेता टीका केली होती. लोढा यांच्या या भाषणाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. मुंबादेवी मतदारसंघात डोंगरी आणि नागपाडा हे भाग येतात या ठिकाणी अल्पसंख्यांकांची संख्या जास्त आहे.

Related posts

भीमा-कोरेगाव दंगल, मराठा व दलित समाजात तेढ निर्माण करण्याचे कारस्तानी – विखे पाटील

News Desk

शिवसेने अंतर्गत काम करण्यास पृथ्वीराज चव्हाण-अजित पवारांचा नकार ?

News Desk

देशातील कोरोनाबाधितांचा आकडा २० हजारच्या पार

News Desk