HW Marathi
महाराष्ट्र राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

#MaharashtraElections2019 : राज्यात सायंकाळी ६ वाजेपर्यंत ६०.०५ टक्के मतदान

मुंबई | राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी २८८ जागांसाठी आज (२१ ऑक्टोबर) मतदान पार पडले. राज्यभरात सायंकाळी सहा वाजेपर्यंत ६०.०५ टक्के मतदान झाले आहे. तर साताऱ्यातील पोटनिवडणुकीत ६०. २५ टक्के मतदान झाले आहे. तसेच कोल्हापूरमध्ये सर्वात जास्त म्हणजे सरासरी ६९ टक्के मतदान झाले असून तर ठाण्यात ४३ टक्के सर्वात कमी मतदान झाले. राज्यभरात आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. राज्यात एकूण ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार आहेत.

तसेच पुरुष  ४ कोटी ६८ लाख ७५हजार, ७५० आणि महिला ४ कोटी २८ लाख ४३ हजार ६३५ मतदार आहेत. तसेच राज्य पोलीस दलातील सुमारे ४० हजार कर्मचारी आणि अधिकारी बंदोबस्तावर असतील. मतदान केंद्राचा परिसर आणि स्ट्राँगरूमच्या बाहेर चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अचानक उद्भवलेला प्रसंग निस्तारण्यासाठी रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स तयार ठेवण्यात आला आहे. मतदान केंद्राच्या परिसरात ड्रोन उडविण्यास बंदी घालण्यात आली आहे, तसेच केंद्राच्या आतमध्ये मोबाइल नेण्यास मनाई करण्यात आली आहे.

 

Related posts

मिलिंद एकबोटे यांना गोरक्षकांकडून मारहाण

News Desk

एक्झिट पोलच्या माध्यमातून हजारो ईव्हीएम्समध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न !

News Desk

न्यायमूर्ती लोयाच्या हत्येचा केसची सुनावणी सुप्रीम कोर्टात

Pooja Jaiswar