HW Marathi
राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

“योग्य वेळी सर्व गोष्टी कळतील,” भुजबळांवर ठाकरेंचे सूचक विधान

मुंबई | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ शिवसेनेत प्रवेश करण्याच्या चर्चा पुन्हा एकदा रंगू लागल्या आहेत. कॉंग्रेसच्या निर्मला गावित आणि राष्ट्रवादी काँगेसच्या रश्मी बागल यांनी आज (२१ ऑगस्ट) मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केला. गावित आणि बागल यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये हातावर शिवबंधन बांधले. यावेळी पत्रकारांनी ठाकरेंना भुजबळ यांच्या सेना प्रवेशावर प्रश्न विचारल्यावर ते म्हटले की, “योग्य वेळी सर्व गोष्टी कळतील,” असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.

दोन दशकांपुर्वी शिवसेना सोडून आलेले आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिग्गज नेते छगन भुजबळ पुन्हा स्वगृही शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगणार आहे. मध्यंतरी छगन भुजबळ हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती . मात्र भुजबळांनी शिवसेनेतून कडाडून विरोध होत आहे.यावर आपण शिवबंधन बांधून घेणार नसून आपल्या मनगटावर घड्याळच राहील असे सांगत शिवसेना प्रवेशाची चर्चा ही निव्वळ अफवा असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले होते.

Related posts

पवारांना सांगा आमचे सरकार येणार !

News Desk

सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, तर गरिबांना महिन्याला ६००० देणार !

News Desk

#Budget2019 : करदात्यांना मोठा दिलासा, ५ लाखापर्यंतचे उत्पन्न कर मुक्त

News Desk