HW Marathi
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९

अखेर वंचित बहुजन आघाडीला मिळाले नवे चिन्ह

मुंबई | लोकसभा निवडणुकीत सर्वांचे लक्षवेधून घेणारा राजकीय म्हणजे वंचित बहुजन आघडीला निवडणूक आयोगाने नवे चिन्हे दिले आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून सर्वच पक्षांनी पक्षबांधणी, राजकीय दौरे, भेटीगाठी यांसारख्या राजकीय घडामोडींना उधाण आले आहेत. या पार्श्वभूमीवर आयोगाने वंचित बहुजन आघाडीला गॅस सिलेंडर हे चिन्ह तर संभाजी ब्रिगेडला शिलाई मशीन हे चिन्ह मिळाले आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची मते खाल्यामुळे वंचित बहुजन आघाडीला भाजपची बी टीम म्हणूनही हिनविले जाते. बहुजन भारिप महासंघाचे प्रमुख बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएम पक्षाशी हातमिळवणी केल्यानंतर वंचित बहुजन आघाडी हा पक्ष स्थापन केला. अगदी थोड्यात कालावधीत या पक्षाने राज्यात आपले मोठे नाव केले आहे. तर, आता विधानसभा निवडणुकांची तयारीही सुरू केली आहे.

मात्र, वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीत कप-बशी या चिन्हावर निवडणूक लढवली होती. तसेच काही ठिकाणी त्यांना वेगळे चिन्ह मिळाले होते. परंतु आता विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी ही गॅस सिलेंडर या चिन्हावर निवडणूक लढवणार आहे. वंचितसोबत आयोनाने महाराष्ट्र क्रांती सेना, हम भारतीय पार्टी, टिपू सुलतान पार्टी, भारतीय जनसम्राट पार्टी या राजकीय पक्षांना देखील चिन्हे दिली आहेत.

 

 

 

Related posts

एसटी महामंडळातील चालक, वाहक, सहाय्यकासह शिपाईंना पदोन्नती

News Desk

गायीच्या पाठीवरुन हात फिरवल्याने नकारात्मकता दूर होते !

News Desk

राज्यात आज ३९४ नवीन रुग्णांची नोंद, एकूण आकडा ६८१७

News Desk