HW Marathi
राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील भाजपच्या वाटेवर ?

पुणे |  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी- काँग्रेस दिग्गज नेते शिवसेना-भाजपमध्ये प्रवेश करत आहे. यात आता कॉंग्रेसचे नेते माजी आमदार हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. पाटील यांना इंदापूर हा त्यांचा पारंपारिक मतदारसंघाच्या जागेवरून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी आग्रही असून काँग्रेस इंदापूरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यास इच्छुक असल्याने  पाटील नाराज झाल्यामुळे ते भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागील आहे.

हर्षवर्धन पाटील इंदापूर मतदार संघातून सलग चार वेळा निवडून आले होते. परंतु, २०१४ विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन यांना पराभूत केले. त्यामुळे सहाजिकच राष्ट्रवादी काँग्रेसकडून या मतदार संघावर दावा सांगण्यात येत आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे. यापूर्वी पाटील यांनी विधानगाथा पुस्तकाच्या प्रकाशनाचे निमंत्रणानिमित्ताने त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना निमंत्रण दिले होते. त्यामुळे पाटील यांच्या पक्षांतराला उधाण आले आहे. यदा कदाचित पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास, इंदापूरमधून पाटील यांच्या विजयाची शक्यता वाढणार आहे.

 

Related posts

उदयनराजेंनी राजीनामा देऊन तेथील लोकांना त्रास देऊ नये !

News Desk

मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्या सीबीआय चौकशीचे आदेश

Gauri Tilekar

जनसंपर्क वाढविण्यासाठी शहांनी घेतली माधुरीची भेट

News Desk