HW Marathi
महाराष्ट्र राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

हेगडेंनी केलेल्या या आरोपाचे फडणवीसांनी केले खंडण

मुंबई | केंद्र सरकारचे ४० हजार कोटी वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीस ८० तासांचे मुख्यमंत्री बनले, असे खळबळजनक वक्तव्य भाजपचे खासदार अनंत हेगडे यांनी केला आहे. हेगडे पुढे म्हणाले की, “तुम्हा सर्वांना माहिती असेलच की, महाराष्ट्रात ८० तासांसाठी मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर फडणवीसांनी राजीनामा दिली. तुम्हाला माहिती आहे का की हे सर्व नाटक कशासाठी केले ? आता हाच प्रश्न सर्वजण विचारत आहेत.”

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेगडे यांच्या आरोप फेटाळून लावले आहे.” राज्याने एकही पैसा केंद्राला परत केला नाही, शेतकऱ्यांच्या मदतीशिवाय कोणताही दुसरा निर्णय घेतला नसल्याचा दावा, फडणवीस यांनी केला. काळजीवाहू मुख्यमंत्री असताना कोणताही धोरणात्मक निर्णय घेतला नाही, असे देखील त्यांनी सांगितले. व्हॉट्अप फॉरवर्ह मेसजेवर काही बोलू नये.” तसेच माझ्यावरील लावण्यात आलेल्या आरोपावर तथ्य नसल्याचे फडणवीस यांनी माध्यमांशी बोलातना सांगितले.

नेमके काय म्हणाले हेगडे

हेगडे म्हटले की,  राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे केंद्राचे ४० हजार कोटी होते. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्तेत आले असते तर त्यांनी ४० हजार कोटींचा दुरुपयोग केला असता, त्यामुळेच फडणवीस यांना ८० तासांचे मुख्यमंत्री व्हावे लागले, असा दावा हेगडेंनी केला आहे. १५ तासांत मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेल्या फडणवीसांनी ४० हजार कोटी योग्य ठिकाणी पोहोचवले असा दावाही हेगडेंनी केलाय.

फडणवीसांनी केले हेगडेच्या आरोपाचे खंडण

राज्याने एकही पैसा केंद्राला परत केला नाही, शेतकऱ्यांच्या मदतीशिवाय कोणताही दुसरा निर्णय घेतला नसल्याचा दावा, फडणवीस यांनी केला. काळजीवाहू मुख्यमंत्री असताना कोणताही धोरणात्मक निर्णय घेतला नाही, असे देखील त्यांनी सांगितले. व्हॉट्अप फॉरवर्ह मेसजेवर काही बोलू नये.” “जेव्हा केव्हा बुलेट ट्रेनचे पैसे येतील, तेव्हा ते पैसे या कंपनीमध्ये येतील, महाराष्ट्र सरकारकडे येणार नाही. महाराष्ट्र सरकारची भूमिका ही केवळ जमीन हस्तांतरणाची आहे. ज्यांना अकाऊंटिंगची पद्धत समजते, त्यांना असे पैसे आले, आणि परत पाठववले असे कधी होत नाही हे कळते. तसेही  मी जेव्हा काळजीवाहू मुख्यमंत्री होतो, किंवा मुख्यमंत्री होतो, निवडणुकीनंतर किंवा त्याकाळात एकही धोरणात्मक निर्णय मी घेतलेला नाही. जोपर्यंत नियमित सरकार येणार नाही, तोपर्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार नाहीत, हे मी जाणीवपूर्वक सांगितले होते. त्यामुळे धादांत खोटे, चुकीचे पसरवण्यात येत आहे. मी पुन्हा स्पष्टपणे सांगतो की एक नवा पैसादेखील महाराष्ट्राचा केंद्राला गेला नाही, केंद्राने तो मागितलेला नाही. मागण्याचा विषय येत नाही, देण्याचा विषय येत नाही”.

 

 

 

Related posts

#LokSabhaElections2019 : पंतप्रधान मोदींनी जाहिरातींवर तब्बल ३०४४ कोटींचा खर्च केला !

News Desk

कृषीराज्यमंत्र्यांच्या अंगावरच फवारले औषध

News Desk

महाराष्ट्रदिनी नांदेडच्या विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांसह, टाटा,आक्षय कुमार संवाद साधणार

News Desk