HW Marathi
राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा आजपासून संवाद दौरा सुरू

मुंबई | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी विविध यात्रांचे आयोजन केले आहे. यात मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा, आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा, राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा सुरु आहेत. यात आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या आजपासून (२३ ऑगस्ट) संवाद दौरा काढणार असून या दौऱ्यातून महाराष्ट्रातील पूरपरिस्थिती, दुष्काळ, बेरोजगारी, महिला सुरक्षा, एकूणच ढिसाळ प्रशासकीय कारभार व सामान्यांप्रति सरकारी अनास्था याविषयावर  जनतेशी संवाद साधणार आहेत.

या संवाद दौऱ्याचा पहिला टप्पा २३ ते ३१ ऑगस्टपर्यंत असणार आहे. पहिल्या टप्प्यातील दौऱ्याती राज्यातील अहमदनगर, सोलापूर, जळगाव, नाशिक, ठाणे, नागपूर, नवी मुंबई या जिल्ह्यात सुप्रिया सुळे फिरणार आहेत. निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी पक्षातील दिग्गज नेत्यांनी शिवसेना-भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यानंतर पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये निराशा पसरली असताना संवाद दौऱ्यातून जास्तीत जास्त जनतेशी लोकांपर्यंत पोहचण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न करत आहे.  यासाठी शिवस्वराज्य यात्रेनंतर सुप्रिया सुळे यांचा संवाद दौरा सुरू होणार आहे.

 

Related posts

समाजाच्या विकासासाठी मातंग तरुणांनी उद्योग आणि सहकार क्षेत्राकडे वळावे

News Desk

गोव्याच्या मंत्रीमंडळाची आज पुनर्रचना, ४ नव्या मंत्र्यांना मिळणार ‘ही’ जबाबदारी

News Desk

इम्तियाज जलील यांची एमआयएमच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड

News Desk