HW Marathi
महाराष्ट्र राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

आता मनसे देखील घेणार राज्यपालांची भेट

मुंबई। राज्यात सत्तास्थापनेचा तिढा सुटण्याऐवजी वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली काँग्रेस-राष्ट्रवादींच्या दिग्गज नेत्यांच्या बैठकांचे सत्र सुरूच आहे. मात्र, राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसाना झाले आहे. याकडे दुर्लक्ष होत होऊन नये. यासाठी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजभवनात जाऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भेटीसाठी जाणार आहे.  त्यामुळे शेतकरी प्रश्नाबाबत चर्चा करण्यासाठी मनसेचे शिष्टमंडळ बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वात राज्यापलांची भेट घेणार आहे.

मनसे आज (२० नोव्हेंबर) बारा वाजताच्या सुमारास राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेणार आहे. या भेटीत शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी ते राज्यपालांकडे करणार असल्याची माहिती मिळाली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काही दिवसांपूर्वी राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेतली होती. त्यावेळी देखील त्यांनी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. त्यांना तातडीने मदत करण्यासाठी निधी तात्काळ वितरित करण्यात यावा, अशी मागणी फडणवीसांनी केली होती.

तसेच  परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी शेतकऱ्यांना ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये खरीप पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ८ हजार रुपयांची तर फळबागांसाठी हेक्टरी १८ हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे. दोन हेक्टरपर्यंत शेती असलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. याशिवाय परीक्षा शुल्क आणि शेतसारा माफ करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. राज्यपालांनी तातडीने मदत वाटप करण्याचे आदेश राज्य प्रशासनाला दिले आहेत. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला. मात्र तूर्तास शेतकऱ्यांना सरकारने थोडासा दिलासा दिला आहे.

 

Related posts

शिवसेनेचे ४५ आमदार आमच्या संपर्कात, भाजप खासदारचा दावा

News Desk

जैश-ए-मोहम्मदचा पुळका कोणाला आहे हे जगाला माहित आहे !

News Desk

पॉलिटिशन्स पोल, कोण बनविणार सरकार ?

News Desk