HW Marathi
महाराष्ट्र राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

सत्तास्थापनेसाठी राज्यपालांचे शिवसेनेला निमंत्रण

मुंबई | भाजप सरकार स्थापन करू शकत नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यापाल भगतसिंग कोश्यारी यांची भेटीदरम्यान सांगितले. यानंतर दुसरा सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी शिवसेनेला सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिले आहे. शिवसेनेला बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यापालांनी उद्या (११ नोव्हेंबर) ७.३० वाजेपर्यंतची वेळीची मर्यादा देण्यात आली आहे. शिवसेनला स्थापन करण्यासाठी अवघे २३ तासांचा कलावधी मिळाला आहे.

थोड्याच वेळापूर्वी  भाजप, रयत, रासप, रिपाई आणि शिवसेना महायुती म्हणून आम्ही विधानसभा निवडणुकीत लढलो. आणि महायुतीला निवडणुकीत जनादेश दिला. मात्र, शिवसेना जनदेने दिलेल्या महाजनादेशाचा अनादर करत असल्याचा आरोप पाटलांनी शिवसेनेवर केला. पाटील पुढे म्हणाले की, शिवसेना आमच्यासोबत सरकार स्थापन करून इच्छित नाही. त्यामुळे भाजप सरकार स्थापन करून शकत नाही, असे ते म्हणाले. तसेच  शिवसेनेला आघाडीसोबत सरकार स्थापन करणार असेल तर त्यांना आमच्या शुभेच्छा, असे ते पत्रकार परिषदेत म्हणाले.

 

 

Related posts

एकबोटे कुटुंबियांना एनकाउंटर करण्याची धमकी

News Desk

मोदींची सिंगापुर येथील मुलाखत पुर्णपणे स्क्रिप्टेड | राहुल गांधी

News Desk

हार्दिक पटेलने तयार केले स्वत:चे मृत्यूपत्र ?

News Desk