HW Marathi
महाराष्ट्र राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

भाजप सरकार स्थापन करू शकत नाही !

मुंबई | “महायुती म्हणून आम्हाला निवडणुकीत जनादेश मिळाला. मात्र, शिवसेना आमच्यासोबत सरकार स्थापन करून इच्छित नाही. त्यामुळे आम्ही सरकार स्थापन करू शकत नाही,” असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यापालांना भेटीदरम्यान सांगितले. भाजप सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी काल (९ नोव्हेंबर) सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले आहे. या पार्श्वभूमीवर आज (१० नोव्हेंबर) भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सरकार स्थापन करणार नसल्याचे स्थापन ठरले.

यासंदर्भात राज्यापालांची आज भेट घेतल्यानंतर पाटील यांनी पत्रकार परिषदेत घेत भाजप सरकार स्थापन करून शकत नसल्याचे जाहीर केले. पाटील पुढे म्हणाले की, शिवसेनेला दुसऱ्या आघाडीसोबत सरकार स्थापन करणार असेल तर त्यांना आमच्या शुभेच्छा, असे ते म्हणाले. भाजप, रयत, रासप, आरपीआय आणि शिवसेना महायुती म्हणून आम्ही विधानसभा निवडणुकीत लढलो. आणि महायुतीला निवडणुकीत जनादेश दिला. मात्र, शिवसेना जनदेने दिलेल्या महाजनादेशाचा अनादर करत असल्याचा आरोप पाटलांनी शिवसेनेवर केला. पाटील पुढे म्हणाले की, शिवसेनेला दुसऱ्या आघाडीसोबत सरकार स्थापन करणार असेल तर त्यांना आमच्या शुभेच्छा.

या पार्श्वभूमीवर भाजपने आज त्यांच्या कोअर कमिटीची बैठक बोलविली होती. ही बैठक कोअर कमिटीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी पार पडली. या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आदी भाजपचे दिग्गज नेते राजभवनात जाऊन राज्यापालांची भेट घेतली. या भेटीदरम्यान आम्ही सरकार स्थापन करण्यास असमर्थ असल्याचे सांगितले.

 

 

 

 

Related posts

आता धनगर समाजाला देखील लागू होणार अनुसूचित जमातीच्या २२ योजना

News Desk

बाबा सिद्दीकीची ४६२ कोटी संपत्ती जप्त ईडीची कारवाई

News Desk

बौद्धिक दिवाळखोरीचे महाराष्ट्रासमोर प्रदर्शन, तरुण भारतमधून राऊतांवर टीका

News Desk