HW Marathi
महाराष्ट्र राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात, पायलटच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

रायगड | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला पुन्हा एकदा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.  मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर आज (११ ऑक्टोबर) दुर्घटनेत बचावले असून पायलटच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला. कर्जतची सभा अटपून पेणला गेल्यानंतरची घटना आहे. हेलिकॉप्टरचे चाके चिखलात रुपतले होते. हेलिकॉप्टरमध्ये मुख्यमंत्री  त्याचा पीए, एक इंजिनिइर, एक पायलट आणि को-पायलट हे पाचजण बसले होते.

मुख्यमंत्री अहमदनगर जिल्ह्यातील कर्जतहून हेलिकॉप्टरने  रायगडमध्ये आले. हेलिकॉप्टर पेण-बोरगाव येथे उतरताना हेलिपॅडवरील मातीत हेलिकॉप्टरची चाके रुतली. मुख्यमंत्र्यांचे ६० टन वजनाचं चार्टर्ड हेलिकॉप्टर आहे. रायगड जिल्ह्यातील दुसरी घटना आहे. मुख्यमंत्री अलिबागला आले होते. दरम्यान, या आधीही मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात होण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यातून मुख्यमंत्री बचावले होते. आता पुन्हा असाच अपघात होताना ते बचावले आहेत.

 

Related posts

ही ममता बॅनर्जींची इमर्जन्सी आहे, आमची नाही !

News Desk

आदित्य ठाकरेंचा ‘नाईट लाईफ’चा निर्णय लांबणीवर पडणार?

News Desk

हरणाच्या मटनाची अवैध विक्री

News Desk