HW Marathi
महाराष्ट्र राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्याचे स्वप्न पूर्ण करेन !

मुंबई | शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्याचे स्वप्न पूर्ण करेन, असे वचन मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिले असल्याचे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. यासाठी मी सर्व प्रयत्न करणार असल्याचे हे वचनपूर्ण करण्यासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या रंगशारदा सभागृहात शिवसैनिकांचा मेळावा घेतला. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, “शिवसेनेचे सर्व २८८ मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांना या मेळाव्यासाठी हजर होते. मात्र, २८८ मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांना बोलविण्यात आले म्हणजे युती तुटली असे होत नाही,” असे ठाकरेंनी स्पष्ट केले.

या मेळाव्यात उद्धव ठाकरे भाजप -शिवसेना यांच्यातील युतीबद्दल काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, युतीबद्दल भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्याशी आमचे बोलणे झाले असून युतीची घोषणा आज-उद्यामध्ये होईल, असे सांगत उद्धव ठाकरेंनी युतीवर शिक्कामोर्तब झाल्याचे स्पष्ट संकेत दिले.

महाराष्ट्रात भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. मी स्वतः शिवसेनाप्रमुखांना हातात हात घेऊन वचन दिले आहे की, एक दिवस मी शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्याचे स्वप्न पूर्ण करेन, असे उद्धव ठाकरेंनी सांगितले. आगामी विधानसभा निवडणुकीत मला सत्ता पाहिजे आहे. त्यामुळे सगळ्या २८८ जागांवरच्या इच्छुकांना मी बोलावले. गेल्या पाच वर्षात आपण जे काही काम केले आहे, त्याबद्दल धन्यवाद द्यायला बोलावले आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

 

Related posts

‘महाराष्ट्र माझा’ छायाचित्र स्पर्धा उपक्रमात सहभागी व्हा

News Desk

लोकांना कायदा हातात घेऊन तुमची धुलाई करण्यास सांगेन, गडकरींचा अधिकाऱ्यांना इशारा

News Desk

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती निमित्ताने मुख्यमंत्र्यांसह पंतप्रधानांचे ट्वीटद्वारे अभिवादन

News Desk