HW Marathi
राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

आता पुढची २० वर्षे मीच खासदार राहणार !

अहमदनगर | “तुमची कामे करायची असतील तर पुन्हा मलाच निवडून द्या. तुमची कामे पूर्ण होणार यात शंकाच बाळगू नका. कारण आता पुढची २० वर्षे अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचा खासदार मीच राहणार आहे”, असा दावा भाजपचे अहमदनगरचे खासदार सुजय विखे पाटील यांनी केला आहे. नगरमधील एका विकासकामांच्या उदघाटन कार्यक्रमात सुजय विखे पाटील बोलत होते. दरम्यान, सुजय विखे-पाटील यांनी केलेल्या या दाव्यामुळे आता राजकीय वर्तुळात अनेक उलट सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.

“तुमची कामे जर पूर्ण करायची असतील तर पुन्हा मलाच निवडून द्या. कामे करताना विखे-पाटलांचा शब्द हा महत्त्वाचा असतो. आम्ही कधीही फक्त कागदावर आश्वासन देत नाही. म्हणूनच मी तुम्हाला जे कोणतेही आश्वासन देत आहे ते काम पूर्ण होणारच. त्यात कोणत्याही प्रकारची शंका बाळगू नका”, असेही सुजय विखे पाटील यावेळी म्हणाले. “तुमची कामे पूर्ण करायची असतील तर मलाच निवडून द्या. कारण पुढची २० वर्षे मीच खासदार राहणार आहे”, असा दावा त्यांनी यावेळी केला.

अहमदनगरमधून काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे लोकसभेच्या तोंडावर सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करून लोकसभा निवडणूक लढविली. राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांचा पराभव करून सुजय विखे पाटील अहमदनगर मतदारसंघातून मोठ्या मताधिक्क्याने निवडून आले. मात्र आता अहमदनगरचे विद्यमान खासदार असलेले सुजय विखे पाटील पुढची २० वर्षे देखील आपणच खासदार राहणार असा दावा करत आहेत. त्यांचा हा दावा त्यांचा अती आत्मविश्वास असल्याची टीका देखील सध्या त्यांच्यावर होत आहे.

Related posts

काश्मीरच्या राष्ट्रपती राजवटीचा कालावधी वाढविण्याच्या प्रस्तावास काँग्रेसचा विरोध

News Desk

लॉकडाऊन कालावधीत १२२१ गुन्ह्यांची नोंद ,२ कोटी ८२ लाखाचा मुद्देमाल जप्त

News Desk

निवडणूक आयोगाच्या नियमांमध्ये मोठे बदल

News Desk