HW Marathi
महाराष्ट्र राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

भाजपने फसविले असे वाटत तर आमच्या व्यासपीठावर यावे !

मुंबई | “महादेव जानकर आणि रामदास आठवले यांचे काल वक्तव्य सुद्धा ऐकण्यासारखे होते. आमचे महायुतीतील सहकारी आहेत, आमचे दोस्त आहेत. एक समाजाचे प्रतिनिधीत्व करतात आहेत, पण त्यांच्या डोळ्यात मात्र अश्रू होते, त्यांच्या ह्रयात वेदना होते, आम्हाला भाजपने फसविले असे वाटत तर आमच्या व्यासपीठावर यावे,” अशी ऑफर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मित्र पक्षांना दिली. अजित पवारांसारखे कोणी रडते का, नेता कधी रडतो का, ईडीच्या भीतीने त्यांना रडू कोसळले. रडणारे नेते निवडणुकीत लढायला उभे आहेत की, गुडघ्यावर बसले आहेत.

“पुढेच्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या बाजुला शिवेसनेचा मुख्यमंत्री बसलेला असेल,” असा विश्वास शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. “ चांद्रयांन २ची तांत्रिक कारणाने व्यवस्थतीत लॅडिंग झाले नाही, मात्र, आमचे आदित्य नावाचे सुर्ययान महाराष्ट्रात फिरून २४ तारीखला मंत्रालयाच्या ६ व्या मजलयावर उतरल्याशिवाय राहणार नाही,’ असा विश्वास राऊत यांनी यावेळी व्यक्त केले.

युती झाली असली तरी संजय राऊत यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच ‘काही बंधने आहेत, बेड्या आहेत, जपून बोलावे लागते. कारण आता आम्ही युतीत आहोत, असे म्हणत राऊतांनी भाजपविरोधात बोलणे टाळले असे तरी मित्र पक्षांना मात्र, शिवसेनेच्या व्यासपीठावर येण्याची ऑफर दिली. राऊतदरम्यान म्हणाले, आमच्या मैत्रीत स्वार्थ नाही, मतलब नाही असे सांगतानाच नोटाबंदी आणि राम मंदिराच्या प्रश्नावरून त्यांनी भाजपवर निशाणा साधला.

 

Related posts

काँग्रेसने दिग्गज नेत्यांमधील वाद सोडविण्यासाठी नेमली त्रिसदस्यीय समिती

Gauri Tilekar

#RamMandir : राम मंदिर उभारणीला विरोध केला, तर सरकार पाडू !

News Desk

काही शरम असेल तर महापौर, मनपा आयुक्तांची हकालपट्टी करा !

News Desk