HW Marathi
महाराष्ट्र राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

राष्ट्रवादीचा पाठिंबा हवा, तर शिवसेनेने एनडीएतून बाहेर पडावे !

मुंबई | “शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा हवा असेल तर त्यांनी एनडीएतून बाहेर पडावे,” असा अट राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी एच. डब्ल्यू.मराठीशी बोलताना सांगितले. मलिक पुढे म्हणला की, शिवसेनेला जाहीर करावे लागेल की त्यांनी भाजपसोबत असलेले सर्व संबंध तोडले असून  केंद्रातील शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी अट त्यांनी ठेवली आहे.

शिवसेनेकडून अद्याप असा कोणताही प्रस्ताव आमच्याकडेल आला नाही. प्रस्ताव आल्यानंतर आमच्या सर्व आमदार आणि नेत्यांची बैठक घेऊन पुढील निर्णय घेऊ, असे देखील मलिक यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना स्पष्टपणे सांगितले. सत्ता स्थापनेचा दावा करावा, ऐवढे संख्याबळ आमच्याकडे नाही. आणि आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करू इच्छित नाही. आम्ही विरोधी पक्षाच्या बाकावर बसण्यास तयार असल्याचे मलिकांना म्हटले आहे.

शिवसेनेला राज्यापालांचे सत्तस्थापनेसाठी निमंत्रण

नुकतेच भाजप सरकार स्थापन करू शकत नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यापालांना भेटीदरम्यान सांगितले. यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दुसरा सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी शिवसेनेला सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिले आहे.  शिवसेनेला बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यापालांनी उद्या (११ नोव्हेंबर) ७.३० वाजेपर्यंतची वेळीची मर्यादा देण्यात आली आहे. शिवसेनला स्थापन करण्यासाठी अवघे २३ तासांचा कलावधी मिळाला आहे.

 

 

 

Related posts

चाकण हिंसाचार प्रकरणी पोलिसांकडून २० जण ताब्यात

अपर्णा गोतपागर

अन् संजय राऊत यांनी ‘ते’ ट्विटच डिलीट केले

News Desk

दिल्लीत काँग्रेस आपसाठी ४ जागा सोडण्यास तयार, मात्र केजरीवालांनी भूमिका बदलली !

News Desk