HW Marathi
महाराष्ट्र राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

#MaharashtraElections2019 : नक्षलवादाला न जुमानता गडचिरोलीत ५२ टक्के मतदान

गडचिरोली | राज्यभरात विधानसभा निवडणुकीच्या मतदान सुरू आहे. राज्यात २८८ जागांसाठी आज (२१ ऑक्टोबर) मतदान सुरू आहे. राज्यातील नक्षलवाद ग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील मतदान दुपारी ३ वाजता पूर्ण झाले. गडचिरोतील ५२ टक्के मतदान झाले असून या नक्षलग्रस्त परिसर असल्यामुळे सुरक्षिततेच्या काणास्तव गडचिरोलीमध्ये दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले. मतदानापूर्वी या भागातील काही नक्षलवाद्यांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचे बॅनर लावण्यात आले होते. गडचिरोलीमध्ये दुपारी १ वाजेपर्यंत सररासरी ५०. ८७ टक्के मतदान झाले.

तसेच लोकसभा निवडणुकीत गडचिरोलीमध्ये अंदाजे ७० टक्क्यांपर्यंत मतदान झाले होते.  गडचिरोलीचा भाग संवेदनशील असल्यामुळे ५ हेलिकॉप्टर लावून मतदान पथकांना वेगवेगळ्या २० कॅम्पपर्यंत पोहोचवण्यात आले. यानंतर ही मतदान पथक चालत किंवा छोट्या वाहनांनी आपल्या मतदान केंद्रापर्यंत आली.

 

Related posts

बेस्टच्या कंडक्टरला कोरोनाची लागण, परळ बेस्ट वसाहत पोलीसांनी केली सील

News Desk

मुंबईसह राज्यभरात जोरदार पाऊस

News Desk

लातूर, चंद्रपूर व परभणी मनपासाठी 19 एप्रिलला मतदान

News Desk