HW Marathi
महाराष्ट्र राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

INX Media Case: पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

नवी दिल्ली | आयएनएक्स मीडिया घोटाळ्या प्रकरणी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. चिदंबरम यांना १ लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे. देशा बाहेर  न जाण्याच्या अटीवर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पण जामीन मंजूर झाल्यानंतरही चिदंबरम यांना जेलमध्ये राहावे लागणार आहे. कारण २४ ऑक्टोबरपर्यंत ते अंमलबजावणी संचलनालयाच्या (ईडी) कस्टडीमध्ये आहे.

नमके काय आहे प्रकरण

चिदंबरम हे अर्थमंत्री असतानाच्या काळात आयएनएक्स मीडियामध्ये विदेशातून ३०५ कोटी रुपयांचा निधी गुंतवण्यात आला होता. याबाबतच्या प्रस्तावाला चिदंबरम यांच्या अध्यक्षतेखालील एफआयपीबीने मंजुरी दिली होती. चिदंबरम यांच्या पुत्राच्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष ताब्यात असलेल्या कंपन्यांद्वारे विदेशातून हा निधी भारतात आणण्यात आला असल्याचा दावा तपास सीबीआयनी केला आहे. आयएनएक्स मीडीया घोटाळ्याप्रकरणी दिल्‍ली उच्च न्यायालयाने २५ जुलै २०१८ रोजी चिदंबरम यांना अंतरीम जामीन दिला होता. त्यानंतर वारंवार त्यांना न्यायालयाने दिलासा दिलेला आहे. मात्र, यावेळी न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळला आहे.

Related posts

Lok Sabha Elections 2019 LIVE UPDATE : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजावला मतदानाचा हक्क

News Desk

राज्यात कॉंग्रेस- राष्ट्रवादी एकत्र: खा. शरदचंद्र पवार

News Desk

राजीव गांधींनी जे केले नाही ते भाजपने करुन दाखविले

News Desk