HW Marathi
महाराष्ट्र राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

कॉंग्रेस-राष्ट्रवादीला राज्यपालांनी सत्तास्थापनेचे निमंत्रण द्यावे !

मुंबई | राज्यापाल भगतसिंग कोश्यारी यांनी भाजपला सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्तास्थापन करण्यासाठी निमंत्रण दिले आहे. मात्र, मुख्यमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये सत्ता संघर्ष सुरू आहे. यामुळे राज्यात सरकार स्थापन होण्यास विलंब होत आहे. तर दुसऱ्य बाजुला राज्यपालांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला राज्यातील दुसरा सर्वात मोठा पक्ष म्हणून आघाडीला सत्तास्थापनेचे निमंत्रण द्यावे, अशी मागणी काँग्रेसचे माजी मुंबई अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी ट्वीटरच्या माध्यमातून केली आहे.

राज्यापालांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले. मात्र, भाजप उद्या (११ नोव्हेंबर) सायंकाळी ८ वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. भाजपची आज (१० नोव्हेंबर) सकाळी कोअर कमिटीची बैठक पार पडली होती. या बैठकीत सत्ता स्थापनेवरून चर्चा झाली. यानंतर पुन्हा एकदा सायंकाळी ४ वाजता कोअर कमिटीची बैठकीला सुरुवात झाली. या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व्हिडिओ कॉन्फरेन्सिंद्वारे भाजप नेत्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तसेच केंद्रातून भाजपचे निवडणूक प्रभारीभूपेंद्र यादव वर्षावर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related posts

छगन भुजबळ शिवसेनेत येणार नाहीत !

News Desk

पर्रिकरांच्या मृत्यूनंतर अशी विधाने करणे योग्य नाही, मुख्यमंत्र्यांची पवारांवर टीका

News Desk

मुरली मनोहर जोशी यांनी लोकसभा निवडणूक लढविण्यास भाजपचा नकार

News Desk