HW Marathi
राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

ईडीच्या नोटीशीविरोधात मनसे २२ ऑगस्टला ठाणे बंदचे आवाहन

मुंबई | कोहिनूर मिल ३ खरेदी प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) नोटीस पाठविण्यात आली आहे. राज ठाकरे यांना २२ ऑगस्ट रोजी चौकशी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. ठाण्यात गुरुवारी (२२ ऑगस्ट) ठाणे बंद करण्याचा इशारा जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिले आहेत. तसेच २२ ऑगस्टला कायदा सुव्यवस्था बिघडल्यास सरकार जबाबदार राहील, असा धमकी वजा इशारा प्रशासनाला जाधव यांनी दिला आहे.

राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात रान पेटवले होते. तसेच नुकतेच ईव्हीएमविरोधात विरोधकांची एकजूट करून त्यांनी आवाज उठवला आहे. त्यानंतर आता कोहिनूर मिलच्या संदर्भात ईडीची चौकशी लावण्याचे संकेत भाजप सरकारने दिले आहेत. २२ ऑगस्टला जर राज ठाकरे यांना चौकशीसाठी बोलावले तर ठाणे बंद करण्यात येणार असल्याचे जाधव यांनी सांगितले आहे. यासंदर्भात कार्यकर्त्यांची बैठक देखील घेण्यात येणार असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले आहे.

ईव्हीएमच्या विरोधात राज ठाकरे यांनी देशभर आंदोलन केल्यामुळेच सरकार कडून हा राजकीय सूड उगवण्यासाठी हा कट रचल्याचे मनसेकडून बोले जात असून संपूर्ण महाराष्ट्रात आणि विशेष करून ठाण्यात यामुळे तीव्र आंदोलन छेडले जाईल असे जाधव यांनी सांगितले

 

Related posts

पश्चिम बंगाल सरकारने हेलिकॉप्टरला परवानगी नाकारल्याने राहुल गांधींची सभा रद्द

News Desk

महाजनांना बाकीच्या उद्योगांपुढे विकासाकडे दुर्लक्ष करावे लागले असेल !

Gauri Tilekar

कॉंग्रेस नेते गुरुदास कामत यांचे निधन, वयाच्या 63 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

News Desk