HW Marathi
राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

तुम्ही मागच्या मागेच बहिर्गमन करायला हरकत नव्हती !

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (२८ नोव्हेंबर) राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शनिवारी (३० नोव्हेंबर) महाविकासाआघाडीकडून सभागृहात आपल्या एकूण १६९ आमदारांसह बहुमत सिद्ध करण्यात आले. दरम्यान, यावेळी भाजपने मात्र महाविकासआघाडीच्या सरकारची बहुमत चाचणी होण्यापूर्वीच सभागृहात गदारोळ घालत सभात्याग केला. मुख्यमंत्र्यांसह महाविकासआघाडीच्या आमदारांचा शपथविधी आणि दुसऱ्या हंगामी अध्यक्षांची निवड या प्रमुख २ मुद्द्यांवरून भाजपच्या आमदारांनी व्हेलमध्ये येऊन चांगलाच गदारोळ घातला. दरम्यान, या पार्श्वभूमीवर आज (१ डिसेंबर) सभागृहात राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी भाजपची फिरकी घेतली. लोकसभेत पंतप्रधानांनी केलेल्या राष्ट्रवादीच्या कौतुकाची भाजपला आठवण करून देत जयंत पाटलांनी भाजपला सुनावले आहे.

आज सभागृहात बोलताना जयंत पाटील म्हणाले कि, “बहिर्गमन मागच्या मागे करायला हरकत नाही. पण काल तुम्ही ज्या पद्धतीने स्टेजपर्यंत येऊन मग बाहेर गेलात. त्यापेक्षा थेट बाहेर जायला हवे होते. आपण एकदा सर्व गटनेत्यांसोबत बसून वॉकआऊट करायच्या प्रथा देखील ठरवल्या पाहिजेत.” त्याचप्रमाणे, “लोकसभेत पंतप्रधान मोदींनी राष्ट्रवादीचे कौतुक केले होते. राष्ट्रवादीचे राज्यसभेचे सदस्य कधीही व्हेलमध्ये आले नाहीत, म्हणून पंतप्रधानांनी राष्ट्रवादीचे कौतुक केले. म्हणूनच व्हेलमध्ये येणे आपण सर्वांनीच टाळले पाहिजे. पंतप्रधान मोदींना जे अपेक्षित आहे ते आपण इथे पाळले पाहिजे”, असे म्हणत जयंत पाटलांनी यावेळी भाजपलाच पंतप्रधान मोदींच्या कौतुकाची आठवण करून देत त्यांना टोला लगावला.

विरोधी पक्षनेत्याच्या निवडीवरूनही भाजपला उपहासात्मक टोला

विरोधी पक्षनेत्यांच्या निवडीबाबत बोलताना देखील यावेळी जयंत पाटील यांनी भाजपसह देवेंद्र फडणवीस यांना उपहासात्मक टोला लगावला. “आता थोड्याच वेळात विरोधी पक्षनेता निवडला जाईल. त्यानंतर पुन्हा बोलूच. पण विरोधी पक्षनेता नेमका कोण होणार ? यावर अजून एकमत झाले कि नाही माहित नाही. पण आम्हाला याबाबत औत्सुक्य आहे. सकाळीच मी दोघांनाही (देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील) भेटलो. मात्र, काही समजले नाही”, असे म्हणत जयंत पाटलांनी भाजपवर निशाणा साधला.
जयंत पाटलांचे हे भाषण सुरु असताना भाजपच्या काही नेत्यांनी टिपणी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी, “कोणीही बसून बोलायचे नाही हा पहिला नियम. कारण, त्यामुळे बोलणाऱ्याचे भाषण लांबत जाते”, असेही जयंत पाटील उपहासाने म्हणाले.

Related posts

आता सरकारने मास्क, सॅनिटायझर्स रेशनच्या दुकानावर उपलब्ध करावेत !

News Desk

वेळीच पायबंद घातला असता तर आज पक्षावर ही वेळ आली नसती !

News Desk

आता राज्याच्या आरोग्य खात्याचा अधिभार एकनाथ शिंदेंकडे 

News Desk