HW Marathi
महाराष्ट्र राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

बार्शीकर पळपुट्या राजकारण करणाऱ्यांना जागा दाखविणार !

बार्शी | बार्शीचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश करत शिवबंधन बाधले. “बार्शीकर अशा पळपुट्या राजकारण करणाऱ्यांना त्यांची जागा दाखविणार, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोपल यांच्यावर टीकास्त्र सोडले. बार्शीचे वैशिट्य म्हणजे बार्शीकर शब्दाला पक्का होता. आज ज्या बार्शीकरांनी मोठे केले त्यांनी शक्ती दिली. त्यांच्या शब्दात न जाण्याची भूमिका घेणार कोणी असे, तर त्याची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही.” असे म्हणत.    

पवार पुढे म्हणाले की, “बार्शीकर अशा पळपुट्या राजकारण करणाऱ्यांना त्यांची जागा दाखविता, हा मला ५० वर्षाचा अनुभव आहे.” सोपल यांचा शरद पवारांनी खरपूस समाचार घेतला आहे. पवार पुढे म्हणाले की, “अनेक वेळा मी तुमच्या पुढे आलो,  महाराष्ट्रच्या विधासभेच्या कामासाठी आलो, अदी प्रमाताईपासून त्यांच्याबरोबर आम्ही काम केले आले. बार्शीचे वैशिट्य म्हणजे बार्शीकर शब्दाला पक्का होता. आज ज्या बार्शीकरांनी मोठे केले त्यांनी शक्ती दिली. त्यांच्या शब्दात न जाण्याची भूमिका घेणार कोणी असे तर त्याची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही.” 

मंत्री पदे देऊनही तुम्ही काय विकास केला !

काही लोक म्हणतात, हे आले ते गेले,  गेल्याची कशाला चर्चा करायची फार तर तुकवटा चारव कारायचा, उगीच गेलेल्याची जास्त चर्चा नको,  मी फक्त समजून घेण्याचा प्रयत्न केला ते का? गेले. मला कोणी तरी सांगितले की, मला बार्शीचा विकास कारायचा, चांगली गोष्टी आहे. इतकी वर्षे आम्ही तुम्हाला निवडून दिली. तिकीटे दिली, मंत्री पदे दिली. तेव्हा तुम्ही काय विकास केला आहात. आणि आज आम्हाला सांगाताय मला विकास कारायचा आहे. आज महाराष्ट्र विधीमंडळमध्ये आणि राज्यामध्ये अनेकांना शक्ती देऊ मोठे करण्याचा प्रयत्न केला. तो विचार पूर्व केला त्या भागातील प्रश्न सूटावे म्हणून दिली समर्थपणे त्या भागाचे प्रतिनिधत्व करावे म्हणून केली.

Related posts

डॉ. मृणालिनी फडणवीस यांची सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्त‍ी

News Desk

महाराष्ट्रातून आतापर्यंत २ लाख ४५ हजार कामगारांची त्यांच्या मूळ राज्यात पाठवणी !

News Desk

#IrrigationScam : चौकशीला सहकार्य करणार, माझा न्यायव्यवस्थेवर संपूर्ण विश्वास !

News Desk