HW News Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

…पण मी कधीही तुरुंगात गेलो नाही, पवारांचा शहांना टोला

सोलापूर | ‘मी आजवर अनेक बरे-वाईट कामे केली, पण कधी तुरुंगात गेलो नाही,’ असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. पवार आजपासून (१७ सप्टेंबर) महाराष्ट्राच्या दौऱ्याला सोलापूरपासून सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्या काही काळापासून गळती लागली आहे.

शहा यांनी रविवारी (१ सप्टेंबर) सोलापूरमध्ये भाजपच्या दुसऱ्या मेगाभतीच्या वेळी महाराष्ट्राच्या जनतेने पवार यांना कित्येक वर्षे सत्ता दिली. .मात्र पवारांनी महाराष्ट्राच्या जनतेसाठी काय केले असा प्रश्न उपस्थिती केला होता. पवारांनी शहांच्या प्रश्नांचे उत्तर देताना म्हणाले की, मी आजवर अनेक बरे-वाईट कामे केली, पण कधी तुरुंगात गेलो नाही.’

यावेळी पवारांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, ‘सोलापूर या स्वाभिमानी जिल्ह्यात लाचारी स्वीकारणाऱ्या नेत्यांना लोक जागा दाखवतात,’ पवार पुढे म्हटले की, “पक्षाला सोडून गेलेल्या लोकांचे नाव कशाला काढता? गेलेले नेते इतिहास जमा होणार आहेत. मावळणाऱ्यांची चिंता करू नका. उजडणाऱ्यांची काळजी घेऊ, गेलेल्यांची चर्चा बंद करा आणि येणाऱ्यांची चर्चा करा.” लाचारी स्वीकारणाऱ्या नेत्यांना आता लोकच जागा दाखवणार असून मी काय म्हातारा झालोय का ? अजून तरुणाईच्या जोरावर अनेकांना घरी पाठवायचे” असा जोरदार टीका पवारांनी विरोधकांवर केली.

संयुक्त महाराष्ट्र चळवळीत १९५७ साली काँग्रेसचा पराभव झाला. मात्र, सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसला विजय मिळाला होता, असा हा जिल्हा आहे. अशीही आठवण पवारांनी यावेळी सांगितली. तसेच इतर ठिकाणी काय झाले याची काळजी न करता, इथे सोलापूरमध्येच इतिहास घडवू. सत्ता येते जाते, त्याची काळजी नाही. मी ५२ वर्षांपासून निवडून येतो. निवडून येण्याचा विक्रम आहे. जनतेमुळे इतके यश प्राप्त झाले. त्यामुळे यश मिळणारच आणि इतिहास घडवणारच, असाही विश्वास पवारांनी यावेळी व्यक्त केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उदयनराजे भोसले ५ सप्टेंबरला करणार भाजप प्रवेश

News Desk

पंतप्रधान ‘हाऊडी मोदी’मध्ये भारतीय समुदायाला संबोधित करणार

News Desk

स्वाभिमान म्हणजे नक्की काय असतो पवारसाहेब?

News Desk