HW Marathi
महाराष्ट्र राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

देख लिया “७० साल मे कुछ नही हुआ.. देख लिया… !

मुंबई | विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी काल (१३ ऑक्टोबर) मुंबईत प्रचार सभा घेण्यात आल्या होत्या. राहुल गांधींनी चांदिवली आणि धारावीमध्ये प्रचारसभा घेतल्या प्रचार सभा भाजपवर घाणाघाती हल्ला चढवला. प्रचारसभा दरम्यान राहुल गांधी यांनी एक व्हिडिओ सोशील मीडियावर चांगला व्हायरल झाला आहे. मात्र, प्रचारसभेत बोलताना राहुल गांधी यांनी चुकून पाच वर्षांऐवजी मागील ७० वर्षांमध्ये काहीच झाले नाही, असे वक्तव्य केले. भाषणादरम्यान ही चूक राहुल यांच्या लक्षात आली नाही. आता हाच व्हिडिओ भाजप समर्थकांकडून ‘राहुल गांधी आमचे स्टार प्रचारक आहेत’ अशा अर्थाने शेअर केला जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी त्यांच्या ट्वीटर आणि फेसबुक हँडलवर काही नेत्यांनाही हा व्हिडिओ शेअर केला आहे.

आमदार सिरसा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन १३ ऑक्टोबर रोजी राहुल गांधींचा एक फेक व्हिडीओ शेअर केला आहे. ट्राय कर लिया, देख लिया “७० साल मे कुछ नही हुआ.. देख लिया…” असे या व्हिडीओत राहुल गांधी म्हणताना दिसत आहेत. मात्र, हा व्हिडिओ मॉर्फ करुन फेक आणि विकृत उद्देशातून बनविण्यात आल्याचा आरोप संकेत यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरुनही हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

भाजपाचे खासदार प्रवेश साहेब सिंग, भाजपाचे दिल्लीमधील प्रवक्ते तेजिंदरपालसिंग बग्गा अशा अनेक व्हेरिफाइड ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ‘महाराष्ट्रात भाजपाचा विजय निश्चित आहे. स्टार प्रचारक सुट्ट्यांनंतर काँग्रेसची सुट्टी करण्यासाठी आले आहेत. काँग्रेसची पोलखोल करताना राहुल गांधी,’ असे सिंग यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Related posts

युती शिवाय तयारीला लागा | मुख्यमंत्री

News Desk

राफेल खरेदीची तांत्रिक माहिती न देता किंमत सांगायला काहीच हरकत नाही | शरद पवार

News Desk

मिलिंद एकबोटेला काळं फासण्याचा प्रयत्न

News Desk