HW Marathi
महाराष्ट्र राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

राज ठाकरे आज मुंबईतील सभेतून प्रचाराचा नारळ फोडणार

मुंबई । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल (९ ऑक्टोबर) पुण्यात होणारी पहिली सभा पावसामुळे रद्द झाली आहे. त्यामुळे राज ठाकरे हे आज (१० ऑक्टोबर) आपल्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. राज ठाकरेंची विधानसभा निवडणुकीसाठी दोन सभा मुंबईतील सांताक्रुझमधील मराठा कॅालनीमध्ये आणि गोरेगावमधील आझाद मैदानात आयोजित करण्यात आल्या आहेत. याबाबत मनसेने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून माहिती दिली आहे.

पुण्यात राज ठाकरे ज्या सभेतील मैदाना पावसामुळे चिखल झाला आहे. तसेच आज सायंकाळी सुरू झालेल्या पावसामुळे सभा स्थळाची अवस्था खूपच बिकट झाली. त्यामुळे राज ठाकरे यांची पहिलीचे सभा रद्द झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांची आज पहिली सभा होणार होती. यावेळी राज ठाकरे आपल्या प्रचाराचा नारळ फोडणार होते. मात्र परतीच्या पावसाने राज ठाकरे यांच्या पहिल्या सभेवर पावसाचे सावत आले होते.

दरम्यान लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात न उतरता भाजप विरोधी भूमिका घेत जोरदार भाषण केली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे कोणती भूमिका घेणार आणि काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे.

Related posts

महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाची संविधानिक रिक्त पदे तातडीने भरवित

News Desk

शाहीनबाग विरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी

rasika shinde

#Vidhansabha2019 : भाजपकडून तावडे, मेहतासह पुरोहित यांना घरचा रस्ता

News Desk