HW Marathi
राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

राष्ट्रवादीच्या करमाळ्याच्या रश्मी बागल-कोलते उद्या घड्याळ सोडून हातावर बांधणार शिवबंधन

करमाळा | राष्ट्रवादीच्या करमाळ्याच्या नेत्या रश्मी बागल-कोलते यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. रश्मी यांनी करमाळा येथे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थिती उद्या (२० ऑगस्ट) दुपारी १२ वाजताच्या सुमारास मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश करण्यार असल्याची माहिती दिली आहे. रश्मी बागलचे बंधू द्विग्विजय यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले की, “लोकसभा निवडणुकीत उत्तम काम करूनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्याची कदर करण्यात आली नाही. पक्षाने मला डावलले, राष्ट्रवादीत कामाची कदर नाही,” असा आरोप करण्यात आला आहे.

“तिकीट मिळण्याची खात्री आहे, म्हणूनच शिवसेनेत प्रवेश करणार आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांना आमच्यावर होणाऱ्या अन्यायाबाबात पत्र लिहून, मेसेज टाकून ही काही प्रतिपादन मिळाला नाही. शेवटी कार्यकर्त्यांसाठी आम्ही हा निर्णय घेतला. आमची माणसे असुरक्षितत झाली. तयावर इलाज म्हणून हा निर्णय आहे. पाच वर्ष पोळलो आहे. आजपर्यंत चुका झाला आता त्याच चुका आता करायच्या नाहीत.”

संजय मामांनी तळागाळातील सामान्य माणसांना सोबत घेऊन उभा केलेला हा बागल गट आहे. याची वाढ करायची असेल, योग्य दिशा देऊन पुढे घेऊन जायचे असेल तर त्यासाठी हा निर्णय घेणं गरजेचे होते. असे म्हणत रश्मी बागल यांनी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. दरम्यान, रश्मी बागल यांचे बंधू दिग्विजय बागल यांनी फेसबुकच्या माध्यमातून शिवसेना प्रवेशाच्या निश्चित झाल्याची माहिती यातून मिळाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आम्ही निष्ठेने आणि प्रामाणीकपणे काम केले. पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी दिलेला शब्द कधी खाली पडू दिला नाही. लोकसभेच्या निवडणूकीत सर्व मतभेद विसरून एकदिलाने पक्षाने दिलेल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी मैदानात उतरलो. केवळ उतरलोच नाही तर उमेदवारापेक्षाही अधिक सभा, बैठका, प्रचार फेऱ्या, जनतेशी संवाद साधून उमेदवाराला तालुक्यातून लिड मिळवून दिले. पक्षानी दिलेल्या शब्दाला जागलो. ही तळमळ, धडपड तालुक्यातील संपुर्ण जनतेने जवळून अनुभवली आहे. पण दुर्दैवाने आपल्या उमेदवाराला अपयश आले.

 

Related posts

वाजपेयींच्या जयंतीनिमित्ताने पंतप्रधानांसह अनेक दिग्गज नेत्यांनी वाहिली आदरांजली

News Desk

#LokSabhaElections2019 : भाजपच्या ४२ स्टार प्रचारकांची नावे जाहीर

News Desk

आता तपासामध्ये एकेक मासा अडकत चालला आहे !

News Desk