HW Marathi
महाराष्ट्र राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, उद्धव ठाकरेंची ठाम भूमिका

मुंबई | “मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल,” असे पुनरुच्चार शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. “शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाच्या भूमिकेवर ठाम”, असल्याचे राऊतांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच  भाजपने माघार घेतली तर सरकार कसे बनणार, असा उलट सवाल ही राऊतांनी भाजपला केला. नुकतेच “भाजप सरकार स्थापन करू शकत नाही,” असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यापाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटीदरम्यान सांगितले.

राज्यापालांच्या भेटीनंतर पाटील यांनी पत्रकार परिषदे घेऊन सांगितले की, महायुती म्हणून आम्हाला निवडणुकीत जनादेश मिळाला. मात्र, शिवसेना आमच्यासोबत सरकार स्थापन करून इच्छित नाही. त्यामुळे भाजप सरकार स्थापन करून शकत नाही, असे ते म्हणाले. तसेच  शिवसेनेला आघाडीसोबत सरकार स्थापन करणार असेल तर त्यांना आमच्या शुभेच्छा, असे देखीला पाटील यावेळी म्हणाले.

यासंदर्भात राज्यापालांची आज भेट घेतल्याेच पाटील यांनी सांगितेल की, शिवसेनेला दुसऱ्या आघाडीसोबत सरकार स्थापन करणार असेल तर त्यांना आमच्या शुभेच्छा, असे ते म्हणाले. भाजप, रयत, रासप, रिपाई आणि शिवसेना महायुती म्हणून आम्ही विधानसभा निवडणुकीत लढलो. आणि महायुतीला निवडणुकीत जनादेश दिला. मात्र, शिवसेना जनदेने दिलेल्या महाजनादेशाचा अनादर करत असल्याचा आरोप पाटलांनी शिवसेनेवर केला. पाटील पुढे म्हणाले की, शिवसेनेला दुसऱ्या आघाडीसोबत सरकार स्थापन करणार असेल तर त्यांना आमच्या शुभेच्छा.

Related posts

LIVE Update | सीएए, एनआरसी विरुद्धच्या मोर्चाला मुंबईत सुरुवात

rasika shinde

…तर १ ऑगस्टला होणार जेल भरो आंदोलन

News Desk

भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, दोघांमध्ये अर्धा तास चर्चा

News Desk