HW Marathi
महाराष्ट्र राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

राज्यात सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेच्या दिल्लीतील राजकीय हलचालींना वेग

मुंबई। भाजपने सरकार स्थापन करू शकत नाही, असे सांगितले. यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुसरा सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण पाठवले आहे. परंतु शिवसेनेला सत्तास्थापन करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे.तर शिवसेनेने भाजपशी सर्व संबंध तोडावेत, एनडीएमधून आणि पर्यायाने सत्तेतून बाहेर पडावं, अशी अट राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी घातली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज (११ नोव्हेंबर) काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी जाणार आहेत. याचवेळी शरद पवार यांची भेट घेण्यासाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत देखील दिल्लीला जाणार आहेत. त्यामुळे राज्यात सत्तास्थापनेबाबत अगोदर शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात बोलणे होईल. त्यानंतर संजय राऊत यांच्यात देखील सत्तास्थापनेबाबत खलबते होतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान संजय राऊत सोनिया गांधी यांची देखील भेट घेण्याची यांची दाट शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि शरद पवार यांच्यामध्ये चर्चा घडवून आणणार असल्याची माहिती मिळाली आहे. उद्धव ठाकरे शरद पवार यांच्याकडे पाठिंबा देण्याची मागणी करणार आहेत.

सत्ता स्थापनेसाठी असे आहे संख्याबळ

राज्यात कोणत्याही पक्षाला सत्तास्थापन करण्यासाठी १४४ आमदारांचे संख्याबळ असणे आवश्यक आहे. शिवसेनेचे ५६ आमदार निवडून आले आहेत. तर त्यांच्याकडे ८ अपक्ष आणि इतर पक्षांच्या आमदारांचा पाठिंबा आहे. असे मिळून शिवसेनेकडे ६४ आमदारांचे संख्याबळ आहे. त्यामुळे शिवसेनेला अधिक ८० आमदारांची आवश्यकता आहे. राष्ट्रवादीकडे ५४ तर काँग्रेसकडे ४४ आमदारांचे संख्याबळ आहे. तिन्ही पक्षांकडे मिळून १६२आमदारांचे संख्याबळ आहे.

Related posts

Dongri Building Collapsed : पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या सहवेदना

News Desk

राज ठाकरेंच्या जाहीर सभांचा खर्च कुठल्या पक्षाच्या खात्यात दाखविणार ?

News Desk

कुटुंबीयांच्या आक्रोशामुळे तरी सरकार जागे होणार आहे का ?

News Desk