HW News Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

अब्दुल सत्तार यांचा शिवसेनेत प्रवेश, सिल्लोडमधून मिळाली उमेदवारी

मुंबई | काँग्रेसमधून हकालपट्टी झालेले औरंगाबादमधून सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील आमदार अब्दुल सत्तार यांनी आज (२ सप्टेंबर) गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती अब्दुल सत्तार यांनी हाती भगवा झेंडा घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून अब्दुल सत्तार हे भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतु सत्तार यांच्या भाजप प्रवेशाला स्थानिक पदाधिकाऱ्यांनी कट्ठर विरोध केल्यानंतर त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. सेनेत प्रवेश करताच क्षण सत्तार यांना उद्धव ठाकरेंनी सिल्लोडची उमेदवारी देखील जाहीर केली.

सत्तार यांनी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून विधान परिषद आमदार सुभाष झांबड यांना काँग्रेसने उमेदवारी दिल्यामुळे सत्तार नाराज झाले होते. यामुळे सत्तार यांनी थेट काँग्रेसविरोधात बंड पुकारले. त्यामुळे काँग्रेसने त्यांच्यावर कारवाई करत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. यादरम्यान सत्तार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात होते. लोकसभेदरम्यान त्यांची भेट घेतली होती. यानंतर भाजपच्या महाजनादेश यात्रेतही मुख्यमंत्र्यांच्या रथावर अब्दुल सत्तार पाहायला मिळाले. दोन महिन्यापूर्वी अब्दुल सत्तार यांनी मातोश्रीवर येऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली होती. सत्तार यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. फक्त दोघांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली होती.

अब्दुल सत्तार यांचा अल्प परिचय

अब्दुल सत्तार हे औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार आहेत. जवळपास ३० वर्षांपासून राजकारणात सक्रीय असून, १९८४ साली ग्रामपचंयत निवडणुकीपासून त्यांनी राजकीय जीवनाची सुरुवात केली. सिल्लोड आणि परिसरात अब्दुल सत्तार यांची राजकीय ताकद मोठी असल्याचे बोल जाते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधानसभा निवडणुकीसाठी आघाडीचा १२५-१२५चा फॉर्म्युला

News Desk

निवडणूक आयोगाची बैठक सुरू, विधानसभा निवडणुकीची तारीख होणार निश्चित

News Desk

एमआयएम ७४ जागांवर विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार

News Desk