HW Marathi
महाराष्ट्र राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

भर पावसात धैर्यशील मानेंचे दमदार भाषण

इस्लामापूर | युतीचे उमेदवार गौरव नायकवडी यांच्या हातकणंगलेचे शिवसेना खासदार धैर्यशील माने यांनी इस्लामपूर विधानसभा मतदार संघात काल (८ ऑक्टोबर) प्रचाराचा नारळ फोडला. मानेंच्या सभेदरम्यान पाऊस पडत असताना त्यांनी भाषण न थांबता सभा गाजवली. मानेंनी व्यासपीठावर असलेल्या मंत्री महोदयांसह शिवसेना-भाजप भर पावसातमध्ये बसावे लागेल.

या सभेसाठी राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह भाजप-शिवसेनेचे मतदारसंघातील आणि सांगली जिल्ह्यातील नेते उपस्थिती होते. यावेळी माने भाषण देण्यासाठी उभे राहताच पाऊस पडण्यास सुरुवात झाली. त्यावेळे सभेसाठी आलेले सर्व कार्यकर्ते उठू लागले. मात्र, मानेंनी कार्यकर्त्यांना बसण्याचे आव्हान करत भरपावसात भाषण देण्यास सुरुवात केली.

तसेच नुकतेच सामना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत धैर्यशील मानेचे कौतुक केले आहे. माने यांनी पावसातच सभा पार पाडायचा निर्धार पुन्हा बोलून दाखवला. येथे उपस्थित असलेले मंत्री खोत यांना पाऊस लागू नये म्हणून उपस्थित कार्यकर्त्याने छत्री आणून दिली. मात्र खासदार माने यांनी मंत्री खोत यांना आपण जनतेबरोबर पावसात भिजतच सभा पार पडायची असे पुन्हा आव्हान केले. यानंतर व्यासपीठावर असणाऱ्या सर्वांना भर पावसात खासदार माने यांचे भाषण संपेपर्यंत बसून राहावे लागले. खासदार माने यांचे भाषण संपताच मंत्री खोत यांचे भाषण रद्द करण्यात आले आणि त्यानंतर काही क्षणात ही सभा संपवण्यात आली.

Related posts

रामदास कदमांचे प्रभादेवी परिसरातील दुकानांवर छापे

Gauri Tilekar

मोदी ज्यांना वाचविण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या खिशातून आम्ही न्याय योजनेसाठी पैसे आणणार !

News Desk

रान डुक्कराचा घरात घुसून महिलेवर हल्ला

News Desk