HW News Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

सातारा लोकसभा पोटनिवडणूक विधानसभेसोबत होणार

सातारा | सातारा लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभा निवडणुकीसोबत घेण्याची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. देशातील अनेक राज्यातील पोटनिवडणुका होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी अधिसूचना काढली आहे. विधानसभेसोबत सातारा लोकसभेची पोटनिवडणूक या पार्श्वभूमीवर उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. उदयनराजे यांना निवडणूक आयोगाकडून मोठा दिलासा मिळाल्याचे बोले जाते.

निवडणूक आयोगाने शनिवारी (२१ सप्टेंबर) महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकाची घोषणा केली. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची घोषणा मात्र केली नव्हती. मात्र, आज (२४ सप्टेंबर) अधिसूचना जाहीर करत आयोगाने पोटनिवडणूक विधासभेसोबत घेण्याचे जाहीर केली आहे. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, शुक्रवार, २७ सप्टेंबरला उमेदवारांना अर्ज भरण्याची तारीख आहे. तर ४ ऑक्टोबर तारखांपर्यंत उमेदवार अर्ज भरू शकतात.

तसेच ५ ऑक्टोबरला उमेदवारांच्या अर्जांची छाननी करण्यात येणार असून ७ ऑक्टोबला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख आहे. विधानसभा निवडणुकीसोबतच २१ ऑक्टोबरला सातारा लोकसभेची पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. तर २४ ऑक्टोबरला मतमोजणी आणि २७ ऑक्टोबरला निकाल घोषित करण्यात येणार आहे. तसेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सातारा येथून उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर विजय मिळवला होता. परंतु विधानसभा निवडणुकीपूर्वी उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पवारांना सांगा आमचे सरकार येणार !

News Desk

ओवैसींच्या सुचनेप्रमाणे वंचितशी आघाडी तोडण्याचा निर्णय | इम्तियाज जलील

News Desk

शिवस्मारकाच्या कामात घोटाळा, राष्ट्रवादी-काँग्रेसचे सरकारवर गंभीर आरोप

News Desk