HW Marathi
महाराष्ट्र राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

तेजस ठाकरेंच्या राजकीय एन्ट्रीबद्दल उद्धव ठाकरे म्हणाले

संगमनेर | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज (९ ऑक्टोबर) संगमनेरमध्ये जाहीर सभा घेण्यात आली होती. यावेळी ठाकरेंनी शिवसेनेचे उमेदवार साहेबराव नवले यांच्या प्रचारार्थ सभा केल्या आहेत. यासभेसाठी केंद्र बिंदू ठरले ते म्हणजे उद्धव ठाकरेंच्ये धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे हे मंचावर उपस्थित होते. आता ठाकरे घराण्यातील आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. तर आता तेजसच्या सभेला उपस्थित राहिल्यांने ते राजकारणात सक्रीय होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळा होऊ लागल्या आहे. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तेजस ठाकरे हे फक्त सभा पाहण्यासाठी आले आहेत.ते जंगलात रमणारे माणूस आहेत, असे स्पष्ट करत सर्व तर्कवितर्कांना पूर्णविराम दिला आहे.

“ते (बाळासाहेब थोरात) म्हणतात की मी बाजीप्रभू देशपांडे आहे. पण बाजीप्रभूंनी रक्त सांडलं यांनी काय सांडले ? त्यांची अक्कल उतू गेली आणि ती सांडली. थोरात साहेब तुम्ही देखील घरी बसायला हरकत नाही. कारण तुमचा नेता बँकाँकला बसला आहे”, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेसचे विधानसभेचे संगमनेर मतदारसंघाचे उमेदवार बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे आज आपल्या संगमनेरमधील सभेत बोलत होते.

संगमनेर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे अधिकृत उमेदवार साहेबराव नवले यांना काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांचे आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “मी नवलेंना की विचारलं तुमच्या विरुद्ध कोण आहे माहीत आहे का ? तर ते म्हणाले की, बाळासाहेब थोरात आहेत. तरीही मी ‘जोरात’ आहे. हा किस्सा सांगितल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पुढे बाळासाहेब थोरात यांच्यावर ही बोचरी टीका देखील केली.

Related posts

नारायण राणेंना मंत्रिमंडळात घेण्या बाबत सस्पेंन्स कायम 

News Desk

#DelhiResults : दिल्ली निवडणुकीच्या निकालाला मी जबाबदार !

अपर्णा गोतपागर

 कडकनाथ कोंबडीपालन घोटाळा : पोलिसांकडून २ संस्थापकांसह ५ जणांवर गुन्हा दाखल

News Desk