HW News Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

आमचा फुटबॉल होऊ नये म्हणून आम्ही युतीच्या भानगडीत पडणार नाही !

मुंबई | काँग्रेस आणि राष्ट्रवादी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत धूळ चारत मोठी ताकद म्हणून समोर आलेली वंचित बहुजन आघाडी काँग्रेससोबत युती करणार नाही, अशी भूमिका वंचितने स्पष्ट केली आहे. गेल्या काही दिवसांपासून वंचित निवडणुकीत काँग्रेससोबत युतीच्या चर्चा रजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. परंतु वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबडेकर यांनी आज (९ सप्टेंबर) मुंबईत पत्रकार परिषद घेऊन युती होणार नसल्याचे सांगत, सर्व चर्चांना पूर्णविराम लावला.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, “काँग्रेसच्या वागणुकीत अजूनही कोणताही फरक झालेला नाही. काँग्रेस अजूनही लोकसभा निवडणुकीप्रमाणेच वागत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे, अशोक चव्हाण यांच्यासोबत बैठक झाली. काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांशीही आमचे बोललो. त्यातून काहीही हाती लागले नाही. त्यामुळे आता आमची काँग्रेससोबत जाण्याची इच्छा राहिलेली नाही.”

आमचा फुटबॉल होऊ नये – आंबेडकर

वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी दिल्लीमध्ये काँग्रेसच्या नेत्यांशी संपर्क साधला. त्याचा कुठलाही उपयोग झाला नाही. विधानसभा निवडणुकीला वेळ फार कमी आहे. त्यामुळे आता आमचा फुटबॉल होऊ नये म्हणून आता आम्ही युतीच्या भानगडीत न अडकता आमची वाटचाल सुरू केली आहे. गणपती विसर्जनानंतर आम्ही आमच्या उमेदवारांची यादी जाहीर करणार आहोत,’ यापुढे जे कुणी येतील त्यांना सोबत घेऊ.” अशी घोषणाही प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. निवडणूक वेळापत्रक लक्षात घेता आम्हाला प्रचारासाठीही वेळ हवा आहे. त्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले.

एमआयएमसोबत युती कायम – आंबेडकर

गेल्या काही दिवसापांसून एमआयएम आणि भारिप बहुजन महासंघाच्या वंचित बहुजन आघाडीत विधानसभा जागा वाटपावरून आंबेकर यांनी एमआयएमला ८ हुनपेक्षा अधिक जागा देण्यास तयार नसल्याने आम्ही आघाडीतून बाहेर जाण्याचा निर्णय घेतल्याचे एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी जाहीर केले. वंचितची जागा वाटपावरून एमआयएमसोबत फुट पडल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. वंचितच्या आघाडीवर पत्रकारांनी आंबेडकरांना प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणाल की, “एमआयएमसोबत युती कायम आमची युती कायम आहे. या युतीसाठी फॉर्म भरण्याच्या शेवटच्या आम्ही त्यांची शेवट्पर्यंत वाट बघणार आहोत, असेही ते म्हणाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप निवडणुकीसाठी पूर्णपणे तयार | सुधीर मुनगंटीवार

News Desk

हर्षवर्धन पाटील आता अन्याय सहन करणार नाही

News Desk

महाजनादेश यात्रेची सांगता, अमित शहांच्या उपस्थित भाजपमध्ये होणार मेगा भरती

News Desk