HW Marathi
महाराष्ट्र राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

‘आम्ही १६२’ ! महाविकासआघाडीचे सर्व आमदारांची पहिल्यांदा ‘परेड’

मुंबई | काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना यांच्या महाविकासआघाडीचे १६२ आमदार पहिल्यांदा सर्वांसमोर येणार असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत दिली आहे. महाविकासआघाडीच्या सर्व आमदार सांताक्रूझ येथील ग्रँड हयात हाँटेल आज (२५ नोव्हेंबर) सायंकाळी ७ वाजता एकत्र येणार असून या आमदारांचे एकत्र फोटोसेशन आणि ओळख परेड होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे दिल्लीत असले तरी महाविकासआघाडीच्या नेत्यांनी आज सकाळी घरी जाऊन बहुमताचे पत्र सादर केले आहेत. महाविकासआघाडीचे नेते जयंत पाटील, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, विनायक राऊत हे राजभवनात पत्र घेऊन गेले होते. राऊतांनी ट्वीटमध्ये सर्व आमदार पहिल्यांदा एकत्र येणार असून राज्यपाल तुम्ही या आणि पहा, असे नमुद करत, “याची देही याची डोळा,” पहायाला येण्याचे आव्हान देखील त्यांनी केले आहे.

 

 

Related posts

महाराष्ट्राचा आकडा १८९५, मुंबईत आढळले आणखी १३४ कोरोना पॉझिटिव्ह

News Desk

पुणे शहरातील नवे प्रतिबंधित भाग आणि नियमावली जाहीर

News Desk

कमलनाथ सरकार पुन्हा अडचणीत, विधानसभा अध्यक्षांनी स्वीकारले ‘त्या’ आमदारांचे राजीनामे

News Desk